मुंबई - वायू चक्रीवादळामुळे मुंबईत बुधवारी सोसाट्याचा वारा सुटला होता. त्यामुळे चर्चगेट स्टेशनबाहेर असलेल्या महात्मा गांधी यांच्या पेंटींगच्या होर्डिंगचा काही भाग अंगावर कोसळल्याने स्टेशन बाहेरून जाणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मधुकर नार्वेकर (65) असे त्या वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
होर्डिंग मधुकर यांच्या अंगावर कोसळ्याने ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना रेल्वे पोलिसांनी जी. टी. रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.