ETV Bharat / state

Measles Patients : मुंबईत गोवर रूग्णसंख्येत वाढ, एक मृत्यू तर ३५३४ संशयित रुग्ण

( Measles Patients in Mumbai ) मुंबईत वाढत्या गोवरच्या रूग्णसंख्येत आतापर्यंत २३३ रुग्णांची तर एकूण ३५३४ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. भिवंडी ठाणे येथील एका ८ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२ झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 23, 2022, 9:26 PM IST

मुंबई : मुंबईमध्ये गेल्या दोन महिन्यात गोवरच्या रुग्णांची संख्या ( Measles Patients in Mumbai ) झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत २३३ रुग्णांची तर एकूण ३५३४ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. भिवंडी ठाणे येथील एका ८ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १२ झाला आहे. १२ पैकी ९ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. २६ रुग्ण ऑक्सीजनवर, ५ रुग्ण आयसीयुमध्ये तर २ रुग्ण व्हेंटिलेटवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

२६ रुग्ण ऑक्सिजनवर, २ व्हेंटिलेटवर - मुंबईत ३५ लाख ७३ हजार ९७६ घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ३५३४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. जानेवारीपासून आतापर्यंत गोवरचे २३३ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी कस्तुरबा, गोवंडी शिवाजी नगर प्रसूती गृह, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, राजावाडी, शताब्दी, सेव्हन हिल, कुर्ला भाभा , क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय बोरिवली आदी रुग्णालयात ३७० बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यापैकी ११३ बेडवर रुग्ण असून २५७ बेड रिक्त आहेत. १३१ जनरल बेडपैकी ८०, १५४ ऑक्सीजन बेड पैकी २६, ३५ आयसीयु बेड पैकी ५ तर २० व्हेंटिलेट पैकी २ व्हेंटिलेटरवर रुग्ण आहेत. आतापर्यंत अतिरिक्त सत्रात १८ हजार ९७२ मुलांचे आणि गरोदर महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

Measles Patients
मुंबईत गोवर रूग्णसंख्येत वाढ

मुंबईत ९ तर बाहेरील ३ मृत्यू - मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १२ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी ९ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण ९ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. एकाचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

८ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू - २२ नोव्हेंबरला रात्री सव्वा नऊ वाजता भिवंडी ठाणे येथील ८ महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला १८ नोव्हेंबर रोजी ताप आला होता. २० नोव्हेंबरला शरीरावर पुरळ आले आहे होते. त्याचे अर्धवट लसीकरण झाले होते. २२ नोव्हेंबरला त्याला ६.५७ वाजता पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री ९.१५ वाजता त्याचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदनानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.

लसीकरण आणि जनजागृतीवर भर - मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात ० ते २ वयोगटातील २० हजार मुलांचे लसीकरण राहिले आहे. काहींनी एकच डोस घेतला आहे. तर काहींनी लसिकरणच केलेले नाही. त्यामुळे अशा २० हजार मुलांवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. या सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यासाठी अतिरिक्त कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत. ० ते ५ वर्षामधील ज्या मुलांना लस दिली नसले त्यांनी लस घ्यावी असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवंडी, चेंबूर, भायखळा, कुर्ला, मालाड, धारावी, सांताक्रूझ, वडाळा या ८ विभागात गोवरचे रुग्ण सर्वाधिक आहेत. यामुळे या विभागात जनजागृती केली जात आहे. धर्म गुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या मार्फत लसीकरणबाबत जनजागृती केली जात आहे. गरज पडल्यास बेड आयसीयु आणि व्हेंटिलेटरची संख्या वाढवली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.