ETV Bharat / state

बनावट घड्याळांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या एकाला अटक

नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट घड्याळे तयार करून त्यांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत २० लाख रुपये किमतीची बनावट घड्याळे जप्त करण्यात आली.

बनावट घड्याळे
author img

By

Published : Sep 19, 2019, 6:01 PM IST

मुंबई - ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांना महागड्या ब्रँडच्या बनावट वस्तू विकणाऱ्या आरोपींची संख्या वाढत आहे. नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट घड्याळे तयार करून त्यांची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलिसांनी छापा टाकला.

बनावट घड्याळे तयार करून त्यांची ऑनलाइन विक्री करणाऱ्या कारखान्यावर मुंबई पोलीसांनी छापा टाकला

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने केलेल्या कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत २० लाख रुपये किमतीची बनावट घड्याळे जप्त करण्यात आली.

हेही वाचा - ऑईल टँकरमधील पेट्रोल चोरून पाणी भरणाऱ्या ३ आरोपींना पोलिसांनी केले गजाआड

मुंबईतील मस्जिद बंदर येथील एका कारखान्यात नामांकित विदेशी कंपन्यांची नावे वापरून बनावट मनगटी घड्याळे तयार केली जातात. ही माहिती क्राईम ब्रँच युनिट 3 ला मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी मस्जिद बंदर येथील काजी सय्यद स्ट्रीट येथील खोली क्रमांक 206 वर छापा मारला.
पोलिसांनी घटनास्थळावरून केलवीन केलीन, मोवाडो स्वीस, फास्ट ट्रॅक या कंपन्याची 4108 बनावट घडयाळे हस्तगत केली. ही घड्याळे ब्रँडेड असल्याचे भासवून त्यांची ऑनलाईन विक्री करण्यात येत होती.

Intro:सध्या ऑन लाईन शॉपिंगच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तू विकत घेण्यासाठी उपलब्ध आहेत. मात्र याच ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून ग्राहकांना महागड्या ब्रँड च्या बनावट वस्तू विकणाऱ्या नटवरलाल आरोपींची संख्याही काही कमी नाही. अशाच एका प्रकरणात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 ने केलेल्या कारवाईत नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट घड्याळं तयार करून त्याची ऑनलाईन विक्री करणाऱ्या कारखान्यावर छापा मारीत एका आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत २० लाख रुपये किमतीची बनावट घड्याळं जप्त करण्यात आली.Body:मुंबईतील मस्जिद बंदर येथील एका कारखान्यात नामांकित विदेशी कंपन्यांची नावं वापरून मोठ्या प्रमाणात बनावट मनगटी घड्याळं तयार केली जात असल्याची माहिती क्राईम ब्रँच युनिट 3 ला मिळाली होती. मस्जिद बंदर येथील काजी सय्यद स्ट्रीट येथील रूम नंबर 206 वर छापा मारला असता पोलिसांना घटनस्थळावरून CALVIN KLEIN, MOVADO SWISS , FAST TRACK सारख्या 4108 घडयाळ हस्तगत केली आहे त्याची किंमत तब्बल 20 लाख रुपये आहे. ही घड्याळं ब्रँडेड असल्याचं भासवून त्यांची ऑनलाईन विक्री करण्यात येत होती. तसेच ही घड्याळं मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांना कमी किमतीत विकली जात होती, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

( बाईट - दत्ता नलावडे , डीसीपी ,क्राईम ब्रँच)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.