ETV Bharat / state

Chhota Rajans Banner: छोटा राजनचे बॅनर झळकल्याने खळबळ, सहा जण ताब्यात कब्बडीस्पर्धाही रद्द

ख्यात गुंड छोटा राजन (Famous gangster Chhota Rajan) उर्फ नाना याच्या वाढदिवसा निमित्त मालाड पूर्वेकडील गणेश मैदानावर कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली. या कबड्डी स्पर्धेच्या बॅनरवर कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा फोटो झळकल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी हा बॅनर उतरवला असुन संबंधितांपैकी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कब्बडीस्पर्धाही रद्द करण्यात आली आहे.

Chhota Rajans Banner
छोटा राजनचे बॅनर उतरवले
author img

By

Published : Jan 14, 2023, 3:35 PM IST

Updated : Jan 14, 2023, 7:11 PM IST

मुंबई: आजवर आपण वाढदिवसानिमित्त राजकीय नेते किंवा अभिनेत्यांचे बॅनर लावले जातात हे पाहिले आहे. मात्र, कुख्यात गुंड छोटा राजन उर्फ नाना याच्या वाढदिवसानिमित्त सीआर सामाजिक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने मालाड पूर्वेकडील कुरार विलेज येथील गणेश मैदानावर कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या कबड्डी स्पर्धेच्या बॅनरवर कुख्यात गँगस्टर छोटा राजन याचा फोटो झळकला आणि एकच खळबळ उडाली. स्थानिक पोलिसांना या बॅनरची माहिती मिळताच पोलिसांनी हा बॅनर खाली उतरवला तसेच बॅनर लावणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली.

जानेवारी 2020 ला देखील ठाण्यातील गडकरी रंगायतन समोरील बस स्टॉपवर नाना ऊर्फ राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजन या सध्या सीबीआयच्या अटकेत असलेल्या गुंडाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले होते. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली होती. सी.आर. सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मध्यरात्री छोटा राजनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले होते. शुक्रवारी छोटा राजनचा वाढदिवस असल्याचा यात उल्लेख होता. त्याला बॅनरबाजी करून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. या बॅनर्सवर शुभेच्छुक प्रकाश भालचंद्र शेलटकर, अध्यक्ष ठाणे शहर, संगीताताई शिंदे, ठाणे शहर, महिला अध्यक्ष, राजाभाऊ गोळे, अध्यक्ष, मुंबई शहर आणि हेमचंद्र दादा मोरे संस्थापक अध्यक्ष या व्यक्तींची नावे आहेत. त्यावर छोटा राजनला शुभेच्छा दिल्या होत्या.

छोटा राजनला शुभेच्छा देणारा हा बॅनर ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे एका बस स्टॉपवर लावण्यात आला होता. तसाच बॅनर आता मालाड पूर्व येथील कुरार विलेजमध्ये झळकल्याने खळबळ उडाली आहे. छोटा राजनवर महाराष्ट्रात तब्बल ७० केसेस नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात वरिष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणाचाही समावेश आहे. तसेच इतर हत्या, खंडणी, धमकावणे अशा अनेक गंभीर स्वरुपांच्या गुन्ह्यांत छोटा राजन फरार होता. ज्याच्या मुसक्या काही वर्षांपूर्वी परदेशात आवळण्यात आल्या होत्या. छोटा राजनला २५ ऑक्टोबर २०१६ रोजी इंडोनेशियातील बाली विमानतळावर पोलिसांनी ताब्यात घेतले.सध्या छोटा राजन हा देशातील सर्वात मोठ्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार जेलमध्ये बंद असून त्याच्यावर आरोप असलेल्या अनेक प्रकरणात छोटा राजन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो सुनावणीस हजर राहतो.

छोटा राजन चे पोस्टर वायरल झाल्यानंतर मालाड पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन हे पोस्टर हटवले तसेच या प्रकरणी सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली. यासोबत अन्य उर्वरितांची ही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून काही लोकांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. तर शनिवारी आणि रविवारी होणारी कबड्डी स्पर्धा ही रद्द करण्यात आली आहे. कुख्यात गुंड छोटा राजन याला गेल्या वर्षी दुहेरी हत्याकांडातून मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय न्यायालयाने दोष मुक्त केले होते 2010 मध्ये छोटा शकील यांच्या असिफ दरी उर्फ छोटे मिया आणि शकील मोडक याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी छोटा राजन व दुहेरी हत्याकांडाचा कट रचल्याचा आरोप होता तसेच छोटा राजनवर खंडणी आणि गुन्हेगारीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, याप्रकरणी गृहनिर्माणमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती दिली.

हेही वाचा : Acid Attack On Woman : लिव्ह इन चा हट्ट करत 62 वर्षीय आरोपीने फेकले अ‍ॅसिड, महिलेची प्रकृर्ती स्थिर

Last Updated : Jan 14, 2023, 7:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.