मुंबई - विधानसभा किंवा लोकसभा हे कायदा बनवणारे सभागृह आहे. त्यामुळे संविधानाची रक्षा हे प्रत्येकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. त्यामुळे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्रगीतानंतर सभागृहात संविधानाची प्रस्तावना वाचली जावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. त्यांनी ट्वीटरवर पोस्ट लिहीत ही मागणी केली.
-
विधानसभा कींवा लोकसभा हे कायदा बनवणारे सभागृह आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
त्या मुळे संविधानाची रक्षा हे प्रथम व प्राथमीक कर्तव्य आहे
त्यामुळे संविधानाची रक्षा व सन्मान हि जबादारी आहे
त्या मुळे अधिवनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्र गीता नंतर संविधानाची प्रस्तावना #preamble वाचली जावी #महाराष्ट्र
">विधानसभा कींवा लोकसभा हे कायदा बनवणारे सभागृह आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 14, 2019
त्या मुळे संविधानाची रक्षा हे प्रथम व प्राथमीक कर्तव्य आहे
त्यामुळे संविधानाची रक्षा व सन्मान हि जबादारी आहे
त्या मुळे अधिवनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्र गीता नंतर संविधानाची प्रस्तावना #preamble वाचली जावी #महाराष्ट्रविधानसभा कींवा लोकसभा हे कायदा बनवणारे सभागृह आहे
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 14, 2019
त्या मुळे संविधानाची रक्षा हे प्रथम व प्राथमीक कर्तव्य आहे
त्यामुळे संविधानाची रक्षा व सन्मान हि जबादारी आहे
त्या मुळे अधिवनाच्या पहिल्या दिवशी राष्ट्र गीता नंतर संविधानाची प्रस्तावना #preamble वाचली जावी #महाराष्ट्र
संविधानाची रक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यातील तत्वांचे आपण सर्वांनी पालन केले पाहीजे, असेही आव्हाड म्हणाले. त्यामुळे संविधान रक्षणाच्या दृष्टीने लोकसभा किंवा विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी राष्ट्रगीतानंतर संविधानाची प्रस्तावना वाचण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीवर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे गरजेचे आहे. सध्या लोकसभेचे अधिवेशन चालू आहे. तर विधानसभेचे कामकाज १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.