मुंबई: काही महिन्यांपूर्वी मनसेने उपस्थित केलेला भोंग्याचा मुद्दा (MNS once again raised issue of bhonga) अद्याप देखील शांत झालेला नाही. काही ना काही कारणावरून नेहमीच मनसेचे नेते आणि कार्यकर्ते हा मुद्दा पुन्हा चर्चेत आणत असतात. आता देखील आणि दिवाळीच्या वेळेत मनसेने (MNS Bhonga Issue on Diwali) हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे. त्याला निमित्त ठरलेय एका मुस्लिम नागरिकाने पोलिसांकडे केलेली तक्रार. विशेष म्हणजे, हा सर्व वाद सोशल मीडियावर झाल्याने त्याची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. (latest news Mumbai)
-
विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल…आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठीकाणी सुरू आहे…थोडं सहन करा कारण दिवाळी आहे.@News18lokmat @zee24taasnews @abpmajhatv @news_lokshahi pic.twitter.com/PlTMLLlqfr
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल…आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठीकाणी सुरू आहे…थोडं सहन करा कारण दिवाळी आहे.@News18lokmat @zee24taasnews @abpmajhatv @news_lokshahi pic.twitter.com/PlTMLLlqfr
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 25, 2022विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल…आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे आम्ही रोज फटाके फोडत नाही मात्र तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठीकाणी सुरू आहे…थोडं सहन करा कारण दिवाळी आहे.@News18lokmat @zee24taasnews @abpmajhatv @news_lokshahi pic.twitter.com/PlTMLLlqfr
— Manoj B Chavan (@ManojBChavan5) October 25, 2022
काय झाला वाद? सोशल मीडियावरती सलमान खान नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीने कांदिवली गणेश नगर परिसरात रात्रीचे दोन वाजले तरी लोक मोठ्या आवाजाचे फटाके फोडत असल्याची तक्रार केली होती. या तक्रारीत त्याने पोलिसांना देखील टॅग केले. आणखी एका कॅनल नावाच्या व्यक्तीने पहाटे साडेचार वाजता देखील फटाके फोडले जात असल्याची तक्रार पोलिसांना केली. या दोन्ही व्यक्तींनी पोलिसांना संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. तर, पोलिसांनी देखील या दोनही ट्विटला रिप्लाय देत संबंधित घटनेची नजीकच्या पोलिस स्थानकात माहिती दिल्याचे म्हटले आहे.
मनसेचा भोंगा... या दोन्हीचा स्क्रीन शॉट मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी शेअर करत आपला भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मनोज चव्हाण आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, "विचार करा मग आम्हाला भोंग्यांचा रोजचा किती त्रास होत असेल. आज तुम्हाला आमच्या फटाक्यांचा त्रास होतो आहे. आम्ही रोज फटाके फोडत नाही. मात्र, तुमची अजान अजुनही भोंग्यावर अनेक ठिकाणी सुरू आहे. थोडे सहन करा कारण दिवाळी आहे."
पुन्हा भोंग्याचा मुद्दा ऐरणीवर - दरम्यान, मनसेने गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू केलेला भोंग्याचा मुद्दा आता दिवाळीपर्यंत काहीसा शांत होत गेला आहे. मात्र, कधीकधी मध्येच हा मुद्दा उपस्थित केला जातो. मध्यंतरी नवरात्र उत्सवाच्या वेळी देखील मनसेकडून हा अनधिकृत भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला गेला होता. आता दिवाळीत देखील हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. त्यामुळे अखेर या मुद्द्याला पूर्णविराम कधी मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.