ETV Bharat / state

मुंबईत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटणार? आंदोलनाच्या परवानगीसाठी दोन्ही समाजाचे शिष्टमंडळ मायानगरीत

OBC Vs Maratha : 20 जानेवारीला मुंबईत ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजानं विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनाची परवानगी मागितली आहे.

OBC Vs Maratha
OBC Vs Maratha
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 5:52 PM IST

मुंबई OBC Vs Maratha : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 20 जानेवारी रोजी आंतरवली सराटीतून मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत. याच दिवशी (20 जानेवारी) मुंबईत ओबीसी मोर्चासाठी ओबीसी जनमोर्चानं मुंबई पोलिसांकडं परवानगी मागितलीय. एकीकडं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले असताना दुसरीकडं ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी 20 जानेवारीलाच ओबीसी समाज राज्यभर आंदोलन करणार आहे. मुंबईत आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी मिळवण्यासाठी ओबीसीच्या शिष्टमंडळानं मुंबई पोलिसांची भेट घेतलीय. यावरून 20 जानेवारीला मुंबईत मराठाविरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटण्याची शक्यता दिसून येत आहे.

उपोषणासाठी आझाद मैदान? : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुकारलेला लढा अंतिम टप्प्यात आहे. 20 जानेवारीला 'ते' मुंबईत धडकणार आहेत. यासाठी त्यांनी पूर्ण तयारीनिशी निश्चय केला आहे. आंदोलनाला अंदाजे 10 लाख गाड्यांचा ताफा, 3 कोटी मराठा समाज मुंबईत धडकणार असल्यानं सरकारनं धास्ती घेतली आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण दिलं जात नाही, तोपर्यंत जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचं हत्यार उपसलंय. या लढ्याचा शेवट मुंबईत करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. जरांगे पाटील यांच एक शिष्टमंडळ आज मुंबईत पोहोचलं असून मुंबईतील आझाद मैदान, शिवाजी पार्क, बीकेसी मैदानाची पाहणी करणार आहे. त्यानंतर याची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली जाणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी मैदानाची निवड करणार आहे. त्यातल्या त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासाठी मुंबईतील आझाद मैदान, सोयीस्कर असल्याची चर्चा शिष्टमंडळाकडून केली जात आहे.

मराठा, ओबीसी आमने-सामने : 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला सुरुवात होत आहे. त्याच दिवशी 20 जानेवारीला मुंबईत आंदोलनासाठी ओबीसी समाजानंसुद्धा परवानगी मागितली आहे. जोपर्यंत ओबीसी समाजाच्या मागण्या मान्य केल्या जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याची भूमिका ओबीसी नेते, तथा माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनासाठी प्रकाश शेंडगे यांनी परवानगी मागितली आहे. याच मैदानात मराठा नेते मनोज जरांगे पाटील उपोषणासाठी बसणार असल्यानं मराठा-ओबीसी समाज आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या कारणास्तव आता मुंबई पोलिसांसह राज्य सरकार काय भूमिका घेणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय.

शिंदे समितीचा अहवाल बोगस : या आंदोलनाविषयी बोलताना ओबीसी समाजाचे नेते प्रकाश अण्णा शेंडगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार पूर्णपणे प्रयत्नशील आहे. मात्र, ओबीसीतून मराठा समाजासाठी आरक्षण मनोज जरांगे मागत आहेत. सरकारनं त्यांच्या आंदोलनाला परवानगी दिली, तर आम्हालाही त्यांनी परवानगी द्यायला हवी. आम्ही मुंबईत 10 लाख गाड्या आणू शकत नाहीत. कारण इतकी श्रीमंती आमच्याकडं नाही. आमचा समाज बैलगाडी घेऊन मुंबईत दाखल होईल. ओबीसी समाजाचे 50 लाख लोकं मुंबईत येतील. सरकारनं दिलेले कुणबी दाखले तात्काळ रद्द करावेत. आमच्या आरक्षणातून कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ देणार नाही. त्याचप्रमाणे शिंदे समितीनं दिलेला अहवाल पूर्णतः बोगस असल्याचंही प्रकाश अण्णा शेंडगे यांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. शिवसेना लोकसभेच्या २३ जागा लढवण्यावर ठाम, गल्लीबोळातील नेत्यांचं कोण ऐकणार - संजय राऊत
  2. पंतप्रधान मोदींचा अयोध्या दौरा; विमानतळासह 11 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं करणार उद्धाटन
  3. नव्या वर्षाचं स्वागत जंगल सफारीनं करताय तर थांबा; 'या' ठिकाणी पर्यटकांना असणार बंदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.