ETV Bharat / state

आम्ही इथे लढतोय, तुम्ही घरात राहून कोरोनासोबत लढा! परिचारिकांचे आवाहन - परिचारिका

या कोरोनाला आम्ही हरवणार, पण त्यासाठी आम्हाला तुमची भक्कम साथ हवी. तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये लढतो, तुम्ही घरात राहून कोरोनाशी लढा, असे कळकळीचे आवाहन मुंबईतील परिचारिकांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने केले आहे.

जागतिक आरोग्य दिन
जागतिक आरोग्य दिन
author img

By

Published : Apr 7, 2020, 12:56 PM IST

मुंबई - आज संपूर्ण जगासमोर कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. देशातही कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आम्ही परिचारिका (नर्स) जीवाची बाजी लावत कोरोनाशी लढत आहोत. या कोरोनाला आम्ही हरवणार, पण त्यासाठी आम्हाला तुमची भक्कम साथ हवी. तेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये लढतो, तुम्ही घरात राहून कोरोनाशी लढा, असे कळकळीचे आवाहन मुंबईतील परिचारिकांनी जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने केले आहे.

आज जागतिक आरोग्य दिन आहे. पहिल्यांदाच आरोग्य दिन अशाप्रकारे आरोग्य क्षेत्रातील मोठ्या संकटात साजरा होत आहे. तेव्हा कोरोनाचे संकट टळो, अशीच अपेक्षा यानिमित्ताने आरोग्य क्षेत्राने व्यक्त केली आहे. नर्सेस रुग्णांसाठी, आपल्यासाठी काय आहेत, ते मुंबईला नव्हे तर सगळया जगला आज समजले आहे. कस्तुरबा, सेंट जॉर्ज, जीटी रुग्णालयापासून राज्यातील सर्व रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये नर्स कोरोनाशी दोन हात करत आहेत. पीपीई किट, सॅनिटायझर्स, मास्कचा तुडवडा असतानाही त्या काम करत आहेत. आम्ही हजारो नर्स जीवघेण्या परिस्थितीत काम करत असताना आम्हाला सुरक्षित ठेवायचे असेल तर तुम्ही घरात राहाणे गरजेचे आहे. जेणेकरून रुग्णांची संख्या कमी होईल आणि आमचा ताण कमी होऊन हे संकट पळून जाईल. तेव्हा आम्ही सैनिक बनून मैदानात उतरलो आहोत, कोरोनाशी लढत आहोत. तुम्ही घरात बसून कॊरोनाशी लढा, इतकेच आमचे आजच्या दिवशी नागरिकांना कळकळीचे आवाहन, अशा शब्दात परिचारिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्र गर्व्हरमेंट नर्सेस फेडरेशनच्या जनरल सेक्रेटरी कमल वायकोळ यांनी नर्सेसच्या कामाचे महत्त्व जगासमोर आणले. खासगी हॉस्पिटलमधील नर्सेसच्याच आरोग्याकडे कसे दुर्लक्ष होत आहे, हेदेखील समोर आले आहे. मुंबईतील वोकहार्ट आणि जसलोकसारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सेसच्या जीवाशी व्यवस्थापणाने खेळ केला. परिणामी वोकहार्टमधील 40 नर्सेसना कोरोनाची लागण झाली असून 200 हून अधिक नर्सेस क्वारंटाइन आहेत.

दुसरीकडे सरकारी-खासगी रुग्णालयात नर्सेसना सुरक्षा साधने पुरविली जात नसल्याने त्यांचेच आरोग्य आता धोक्यात आले आहे. नर्सेसला सुरक्षा साधने उपलब्ध व्हावीत म्हणून आंदोलन करावे लागत आहे. ही ही एक दुर्दैवाची बाब आहे. पण तरीही रुग्णसेवा आम्हाला महत्त्वाची आहे, असे म्हणत आम्ही लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. फक्त आम्हाला सरकारची-तुमची साथ हवी, सुरक्षा साधने हवी आणि ही साथ नक्की मिळेल, कोरोनाचे संकट टळेल, असा विश्वासही वायकोळ यांनी व्यक्त केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.