ETV Bharat / state

कोरोनाची धास्ती... ५०३ खाटांच्या कामा रुग्णालयात केवळ ४० रुग्ण - Cama Hospital mumbai corona virus

कोरोनाच्या धास्तीने मुंबईत महिलांच्या विविध उपचारांसोबत प्रसुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा अँड अल्बेल्स या ५०३ खाटांच्या रुग्णालयात शुकशुकाट पसरला आहे. केवळ ४० रुग्ण सध्या या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसागणिक एक-दोन रुग्णच येथे तपासणीसाठी येत असल्याने येथील डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांना कामच उरले नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

कोरोनाच्या धास्तीने ५०३ खाटांच्या कामा रुग्णालयात केवळ ४० रुग्ण

author img

By

Published : Mar 30, 2020, 2:59 PM IST

Updated : Mar 30, 2020, 3:40 PM IST

मुंबई - कोरोनाच्या धास्तीने मुंबईत महिलांच्या विविध उपचारांसोबत प्रसुतीसाठी प्रसिद्ध असलेल्या कामा अँड अल्बेल्स या ५०३ खाटांच्या रुग्णालयात शुकशुकाट पसरला आहे. केवळ ४० रुग्ण सध्या या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दिवसागणिक एक-दोन रुग्णच येथे तपासणीसाठी येत असल्याने येथील डॉक्टर, परिचारिका तसेच कर्मचाऱ्यांना कामचं उरले नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

५०३ खाटांच्या कामा रुग्णालयात केवळ ४० रुग्ण

कामा रुग्णालय हे सीएसएमटी स्थानकाजवळील मुंबईतील सर्वात महत्वाचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते. या रुग्णालयात ५०३ खाटांची सोय असून डॉक्टर, परिचारिका, तृतीय आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी असे मिळून एकुण ६८८ जणांचा स्टाफ आहे. यात असून 'अ' आणि 'ब' वर्ग दर्जाचे तब्बल १५ वरिष्ठ डॉक्टर येथे कार्यरत असून ३५० परिचारिका चार शिफ्टमध्ये कार्यरत असतात. तर तृतीयश्रेणीतील कर्मचाऱ्यांची संख्या ही ८८ इतकी असून चतुर्थश्रेणीतील २३५ कर्मचारी कामा रुग्णालयात आपली सेवा देत असतात. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामा रुग्णालय हे रिकामे पडले असून या रुग्णालयात केवळ ४० रुग्णच उपचार घेताहेत. या स्थितीत कामा रुग्णालयात एकुण ६८८ डॉक्टर, नर्स आदी कर्मचारी असल्याने अनेकांच्या हाताला काम नसते. यामुळे येथील डॉक्टरांना कोरोनाच्या संदर्भात मुंबईत सुरू असलेल्या कस्तुरबा तसेच इतर रुग्णालयात सेवेसाठी देण्याची मागणी केली जात आहे.

Last Updated : Mar 30, 2020, 3:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.