मुंबई - मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरू झाला आहे. मार्चपासून कोरोनाचे रुग्ण सतत वाढत होते. मात्र, समाधानाची बाब म्हणजे रुग्णांचा हा आकडा घटत चालला आहे. बुधवारी ५ ऑगस्टला ११२५ रुग्ण आढळून आले होते. काल गुरुवारी ६ ऑगस्टला ९१० रुग्ण आढळून आले होते. तर, आज शुक्रवारी ७ ऑगस्टला ८६२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तीन दिवसात कोरोनाचे रुग्ण आढळून यायच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे.
मुंबईत आज (शुक्रवारी) कोरोनाचे 862 नवे रुग्ण आढळून आले असून 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोना ग्रस्तांचा आकडा 1 लाख 21 हजार 027 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 690 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 1 हजार 236 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 93 हजार 897 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 143 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 85 दिवसांवर पोहचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 45 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 29 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 31 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 1 हजार 236 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 93 हजार 897 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 21 हजार 027 रुग्ण असून 93 हजार 897 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 690 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 143 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 85 दिवस तर सरासरी दर 0.82 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 619 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 661 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 83 हजार 160 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.