ETV Bharat / state

राष्ट्रवादीच्या आमदारांवर अजित पवारांचाच व्हिप चालेल; शेलारांचा पुनरुच्चार

author img

By

Published : Nov 24, 2019, 5:16 PM IST

राष्ट्रवादीच्या आमदारांवर आता अजित पवारांचाच व्हिप चालेल, असा पुनरुच्चार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. वसंतस्मृती येथील भाजपाच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

भाजप आमदार आशिष शेलार

मुंबई - भाजपच्या आमदारांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वांनी सहमती दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांवर आता अजित पवारांचाच व्हिप चालेल, असा पुनरुच्चार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. वसंतस्मृती येथील भाजपाच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

  • Ashish Shelar, BJP after meeting of party legislators in Mumbai: In today's meeting all expected MLAs were present, a meeting of those independent MLAs who are supporting us will be held at a different place. #Maharashtra https://t.co/2AApzsXBbh

    — ANI (@ANI) November 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, महायुतीला जनादेश देण्यात आला. मात्र शिवसेनेने त्याचा अनादर केला. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही पुढे जात होतो. मात्र त्याला तिलांजली देण्याचे महापाप सेनेने केले, असा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा - आमदार नरहरी झिरवळ 'नॉट रिचेबल', आंदोलनाचा राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा इशारा

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशाप्रकारचा प्रस्तावही ठेवण्यात आला. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या आमदारांना कुठेही ठेवण्याचा प्रश्नच नाही. जे पक्ष स्वत:च्या आमदारांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, असे पक्ष म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात केवळ ऑपरेशन देवेंद्र सुरु असल्याचेही ते म्हणाले.

Intro:Body:

राष्ट्रवादीच्या आमदारांवर आता अजित पवारांचाच व्हिप चालेल, शेलारांचा पुनरुच्चार

मुंबई - भाजपच्या आमदारांनी अजित पवारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला. त्याला सर्वांनी सहमती दिली. राष्ट्रवादीच्या आमदारांवर आता अजित पवारांचाच व्हिप चालेल, असा पुनरुच्चार भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला. वसंतस्मृती येथील भाजपाच्या बैठकीनंतर माध्यमांशी ते बोलत होते.

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, महायुतीला जनादेश देण्यात आलाय. मात्र शिवसेनेने त्याचा अनादर केला. बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही पुढे जात होतो. मात्र त्याला तिलांजली देण्याचे महापाप सेनेने केले, असा आरोपही त्यांनी केला.

मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी काम करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशाप्रकारचा प्रस्तावही ठेवण्यात आला. त्यामुळे विश्वासदर्शक ठराव आम्ही जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपच्या आमदारांना कुठेही ठेवण्याचा प्रश्नच नाही. जे पक्ष स्वत:च्या आमदारांवर विश्वास ठेवू शकत नाहीत, असे पक्ष म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आहेत, अशी टीका त्यांनी केली. महाराष्ट्रात केवळ ऑपरेशन देवेंद्र सुरु असल्याचेही ते म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.