ETV Bharat / state

'अविध्न' आग प्रकरणी मालक व भाडेकरुंना नोटीस, गुन्हाही दाखल - Short circuit

करीरोड येथील 'अविघ्न' या 60 मजली इमारतीला मागील महिन्यात आग लागली होती. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून या प्रकरणी घर मालक व भाडेकरू या दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या प्राथमिक चौकशी अहवालात देण्यात आली आहे.

घटनास्थळ
घटनास्थळ
author img

By

Published : Nov 9, 2021, 10:40 PM IST

मुंबई - करीरोड येथील 'अविघ्न' या 60 मजली इमारतीला मागील महिन्यात आग लागली होती. या आगीमध्ये एकाचा मृत्यू झाला होता. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असून या प्रकरणी घर मालक व भाडेकरू या दोघांना नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हाही नोंद करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या प्राथमिक चौकशी अहवालात देण्यात आली आहे.

आगीचा अहवाल -

22 ऑक्टोबरला करीरोड रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या 'अविघ्न' 60 मजली इमारतीमधील 19 व्या मजल्यावर आग लागली. ही आग 20 व्या मजल्यापर्यंत पसरली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमक दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. पण, इमारतीतील आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त, इमारतीतील पाण्याचा दाब योग्य नसल्याने अग्निशमक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणींचा सामना करावा लागला. शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलास यश आले. या घटनेची प्राथमिक चौकशी मुंबई अग्निशमन दलातफेॅ करण्यात आली. या प्राथमिक चौकशी अहवालात 1902 फ्लॅटमधील सदोष वायरींगमुळे आगीचा भडका उडाल्याचे निदर्शनास आले आहे. तसा प्राथमिक अहवाल मंगळवारी (दि. 9) स्थायी समितीत सादर करण्यात आला असून अतिरिक्त आयुक्त (शहर) यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

एकाचा मृत्यू, गुन्हा दाखल -

ही आग लागली तेव्हा सुरक्षा रक्षकाने वर जाऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याच प्रयत्न केला. मात्र, आग भडकल्याने त्याने खिडकीतून बाहेर पडण्याचा विचार केला. यावेळी त्याचा हात निसटून तो सुरक्षा रक्षक खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान, इमारतीचे मालक व भाडेकरुंविरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात एफआरआय दाखल करण्यात आला असून आग प्रतिबंधक यंत्रणा नादुरुस्त असल्याने मालक व भाडेकरुवर यांना नोटीस बजावण्यात आल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. हा प्राथमिक चौकशीचा अहवाल आज पालिकेच्या स्थायी समितीमध्ये सादर करण्यात आला आहे.

हे ही वाचा - संपात सहभागी झालेल्या 376 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई; तर आज 247 आगार बंद!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.