ETV Bharat / state

गॅस गळती प्रकरणी केमिकल आणि गॅस कंपन्यांना नोटीस; उपाययोजना करण्याचे आदेश - केमिकल आणि गॅस कंपनी

मुंबईच्या घाटकोपर, विक्रोळी, गोवंडी, अंधेरी, चांदीवली, पवई आदी भागात गॅस गळती झाली. त्यामुळे गॅसची दुर्गंधी पसरल्याची तक्रार नागरिकांनी पालिका, पोलीस, अग्निशमन दल, केमिकल व गॅस कंपन्यांकडे केली होती.

प्रतिकात्मक छायाचित्र
author img

By

Published : Oct 4, 2019, 11:22 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी मुंबईत गॅस गळती झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याची चौकशी करण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गॅस गळतीच्या घटना घडू नयेत व घडल्यास काय उपाययोजना कराव्यात, याबाबत संबंधित कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच गॅस गळती रोखता यावी आणि ती निदर्शनास यावी म्हणून केमिकल वाहतूक वाहनांवर जीपीएस, मॉनेटरिंग सिस्टीम लावण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईच्या घाटकोपर, विक्रोळी, गोवंडी, अंधेरी, चांदीवली, पवई आदी भागात गॅस गळती झाल्याची व त्यामुळे गॅसची दुर्गंधी पसरल्याची तक्रार पालिका, पोलीस, अग्निशमन दल, केमिकल व गॅस कंपन्यांकडे केली होती. याबाबत शोध घेऊनही एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाला गॅस गळतीचा शोध लागलेला नाही. यामुळे आयआयटी, निरी, पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस, अग्निशमन दल, केमिकल व गॅस कंपन्या यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची बैठक आज पालिका मुख्यालयात संपन्न झाली.

हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

यावेळी अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी गॅस गळतीसारख्या गंभीर घटनेबाबत सर्व गॅस, केमिकल कंपन्यांना नोटीसा बजावण्यात यावी. गॅस गळती होऊ नये व गॅस गळती झाल्यास अथवा आग लागल्यास त्या घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच गॅस गळती, आग लागणे आदी घटना घडू नयेत अथवा घडल्यास काय करावे, याबाबत संबंधीत गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच केमिकल वाहतूक करणार्‍या वाहनांवर जीपीएस आणि मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित गॅस, तेल कंपन्यांना दिले आहेत. तसेच, गॅस डिटेक्टर बलुन्स, हवेतील घटक ओळखणारी यंत्रणा सर्व २४ विभागांत बसविणे. केमिकल वाहतूक करणार्‍या वाहनचालक, सहाय्यकास आवश्यक प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले.

हेही वाचा - उरणच्या ओएनजीसीमध्ये पुन्हा एकदा वायुगळती; ग्रामस्थ चिंतेत

Intro:मुंबई - मुंबईत काही दिवसांपूर्वी गॅस गळती झाल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याची चौकशी करण्यासाठी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने गॅस गळतीच्या घटना घडू नयेत व घडल्यास काय उपाययोजना कराव्यात, याबाबत संबंधित कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत. तसेच गॅस गळती रोखता यावी तसेच ती निदर्शनास यावी म्हणून केमिकल वाहतूक वाहनांवर जीपीएस, मॉनेटरिंग सिस्टीम लावण्यास सांगण्यात आले आहे.Body:मुंबईच्या घाटकोपर, विक्रोळी, गोवंडी, अंधेरी, चांदीवली, पवई आदी भागात गॅस गळती झाल्याची व त्यामुळे गॅसची दुर्गंधी पसरल्याची तक्रार पालिका, पोलीस, अग्निशमन दल, केमिकल व गॅस कंपन्यांकडे केली होती. याबाबत शोध घेऊनही एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाला गॅस गळतीचा शोध लागलेला नाही. यामुळे आयआयटी, निरी, पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, पोलीस, अग्निशमन दल, केमिकल व गॅस कंपन्या यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीची बैठक आज पालिका मुख्यालयात संपन्न झाली.

यावेळी, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी, गॅस गळतीसारख्या गंभीर घटनेबाबत सर्व गॅस, केमिकल कंपन्यांना नोटीसा बजावण्यात यावी. गॅस गळती होऊ नये व गॅस गळती झाल्यास अथवा आग लागल्यास त्या घटना रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच गॅस गळती, आग लागणे आदी घटना घडू नयेत अथवा घडल्यास काय करावे, याबाबत संबंधीत गॅस कंपनीच्या अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच केमिकल वाहतूक करणार्‍या वाहनांवर जीपीएस आणि मॉनेटरिंग सिस्टीम बसवण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित गॅस, तेल कंपन्यांना दिले आहेत. तसेच, गॅस डिटेक्टर बलुन्स, हवेतील घटक ओळखणारी यंत्रणा सर्व २४ विभागांत बसविणे. केमिकल वाहतूक करणार्‍या वाहनचालक, सहाय्यकास आवश्यक प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.