ETV Bharat / state

मान्सून येतोय ..! १ जूनला केरळात, तर १० जूनला महाराष्ट्रात? स्कायमेटचा प्राथमिक अंदाज - अंदमान निकोबार

सुरुवातीलाच तळपत्या उन्हात आल्हाद देणारी एक बातमी म्हणजे येत्या पाच दिवसात(१०ते १५ मे) राज्यासह कर्नाटक, राजस्थान,गुजरात,एमपी, बिहार या भागात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर १४ मे मान्सूनच्या आगमनाची आणि पुढील प्रवासाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

मान्सून येतोय ..!
author img

By

Published : May 9, 2019, 4:45 PM IST

Updated : May 9, 2019, 5:27 PM IST

मुंबई - नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर शेतीसह अनेक क्षेत्रातील घडामोडींना वेग येतो. देशातील एकूण पर्जन्यमानापैकी ७० टक्के पाऊस याच काळात पडतो. मान्सूनचा शेती आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असल्याने संपूर्ण देश त्याच्या आगमानाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनचा प्राथमिक अंदाज जारी केला आहे.

मान्सून आगमनाची वार्ता शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरते, कारण, मान्सूनला उशीर झाला तर त्याचा परिणाम खरीप हंगामावर होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा मान्सून तुमच्या शहरात अंदाजे कधीपर्यंत दाखल होतो, याचा एक आढावा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सादर केला आहे. त्यानुसार मान्सून महाराष्ट्रात १० जून पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

सुरुवातीलाच तळपत्या उन्हात आल्हाद देणारी एक बातमी म्हणजे येत्या पाच दिवसात(१०ते १५ मे) राज्यासह कर्नाटक, राजस्थान,गुजरात,एमपी, बिहार या भागात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर १४ मे ला मान्सूनच्या आगमनाची आणि पुढील प्रवासाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

अंदमानात २० मे; तर केरळात १ जूनला-

भारतात दाखल होण्यापूर्वी मान्सून २० मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर आपली हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील १० दिवसात म्हणजेच १ जूनच्या सुमारास मान्सून भारतातील प्रवेश द्वारावर म्हणजेच केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. ज्यानतंर ४ महिने तो भारतात मुक्कामी राहील.

मान्सून आगमनाच्या पहिल्या टप्प्यात कोची, त्रिवेदम आणि चेन्नईसह तामिळनाडूचा जास्तीत जास्त भागात पावसाला सुरुवात होईल. त्यासोबतच ईशान्य भारतातील मणीपूर मिझोराम आणि त्रिपुरातही दाखल होईल.

मान्सून पुढच्या टप्प्यात म्हणजेच ५ जूनपर्यंत तो कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बाजूच्या तेलंगणामध्ये सक्रीय होईल. तर उत्तर भारतातील मान्सूनची दुसरी शाखा दिसपूर अगरताळा गुवाहटी शिलाँग आणि इंफाळमध्ये हजेरी लावेल.

महाराष्ट्रात दाखल-

मान्सूनचा पुढचा टप्पा हा पावसासाठी आतुरलेल्या मुंबई आणि कोलकाता शहरात दाखल होण्याचा आहे. १० जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज स्काय मेटने वर्तविला आहे. या प्रवासानंतर मान्सूनची गती थोडी मंदावेल असेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे १ जुलैला उत्तर प्रदेशातून मान्सूनचा पाऊस दिल्लीच्या उबंरठ्यावर जाऊन धडक देईल. तेथून उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरपर्यंत त्याचा प्रवास सुरूच राहिल. त्याचवेळी पंजाब आणि राजस्थानात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल. त्यानंतर मान्सून पुन्हा तब्बल १५ दिवासांच्या विश्रांती घेईल असेही स्कायमेटने म्हटले आहे.

यावेळी मान्सूनचा पाऊस सरासरीच राहणार असून ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.

Intro:Body:

मान्सून येतोय ..! १ जूनला केरळात, तर १० जूनला महाराष्ट्रात? स्कायमेटचा प्राथमिक अंदाज

मुंबई - नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मान्सूनच्या आगमनानंतर शेतीसह अनेक क्षेत्रातील घडामोडींना वेग येतो. देशातील एकूण पर्जन्यमानापैकी ७० टक्के पाऊस याच काळात पडतो. मान्सूनचा शेती आणि अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम  होत असल्याने संपूर्ण देश त्याच्या आगमानाकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसला आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने मान्सूनचा प्राथमिक अंदाज जारी केला आहे.

मान्सून आगमनाची वार्ता शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरते, कारण, मान्सूनला उशीर झाला तर त्याचा परिणाम  खरीप हंगामावर होऊ शकतो. त्यामुळे यंदाचा मान्सून तुमच्या शहरात अंदाजे कधीपर्यंत दाखल होतो, याचा एक आढावा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सादर केला आहे. त्यानुसार मान्सून महाराष्ट्रात १० जून पर्यंत दाखल होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

सुरुवातीलाच तळपत्या उन्हात आल्हाद देणारी एक बातमी म्हणजे येत्या पाच दिवसात(१०ते १५ मे) राज्यासह कर्नाटक, राजस्थान,गुजरात,एमी, बिहार या भागात पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर १४ मे मान्सूनच्या आगमनाची आणि पुढील प्रवासाची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

अंदमानात २० मे; तर केरळात १ जूनला-

भारतात दाखल होण्यापूर्वी मान्सून २० मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर आपली हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील १० दिवसात म्हणजेच १ जूनच्या सुमारास मान्सूनचे भारतातील प्रवेश द्वारावर धडक देईल. म्हणजेच मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. ज्यानतंर ४ महिने तो भारतात मुक्कामी राहील.

मान्सून आगमनाच्या पहिल्या टप्प्यात कोची, त्रिवेदम आणि चेन्नईसह तामिळनाडूचा जास्तीत जास्त भागात पावसाला सुरुवात होईल. त्यासोबतच ईशान्य भारतातील मणीपूर मिझोराम आणि त्रिपुरातही दाखल होईल.

मान्सून पुढच्या टप्प्यात म्हणजेच ५ जून पर्यंत तो कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बाजूच्या तेलंगणामध्ये सक्रीय होईल. तर उत्तर भारतातील मान्सूनची दुसरी शाखा दिसपूर अगरताळा गुवाहटी शिलाँग आणि इंफाळमध्ये हजेरी लावेल.

महाराष्ट्रात दाखल-

मान्सूनचा पुढचा टप्पा हा पावसासाठी आतुरलेल्या मुंबई आणि कोलकाता शहरात दाखल होण्याचा आहे. १० जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज स्काय मेटने वर्तविला आहे. या प्रवासानंतर मान्सूनची गती थोडी मंदावेल असेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे १ जुलैला उत्तर प्रदेशातून मान्सूनचा पाऊस दिल्लीच्या उबंरठ्यावर जाऊन धडक देईल. तेथून उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरपर्यंत त्याचा प्रवास सुरूच राहिल. त्याचवेळी पंजाब आणि राजस्थानात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल. त्यानंतर  मान्सून पुन्हा तब्बल १५ दिवासांच्या विश्रांती घेईल असेही स्कायमेटने म्हटले आहे.

यावेळी मान्सूनचा पाऊस सरासरीच राहणार असून ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.

Conclusion:
Last Updated : May 9, 2019, 5:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.