ETV Bharat / state

एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव लांबीवर; तूर्तास प्रवाशांना दिलासा - बस बातमी

इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळाने 17 टक्के एसटीचे भाडेवाढ करण्याबाबत संचालक महामंडळाने प्रस्ताव तयार केला होता. मात्र, अद्याप या प्रस्तावास मंजुरी मिळालेली नाही.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 12, 2021, 4:46 PM IST

मुंबई - सततच्या इंधन दरवाढ आणि निर्बंधामुळे एसटी महामंडळाला दररोज तोटा होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच एसटी महामंडळाने 17 टक्के एसटीचे भाडेवाढ करण्याबाबत संचालक महामंडळाची चर्चा झाली होती. तसा प्रस्तावही एसटी महामंडळाने तयार केला आहे. मात्र, अद्याप या प्रस्ताव मंजूर झालेला नाही. त्यामुळे तूर्तास प्रवाशांना दिलासा मिळालेला आहे.

प्रस्तावाला मिळाली मंजुरी

कोरोनामुळे एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. त्यामुळे कामगारांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही. सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळेही पूर्ण क्षमतेने बसेस धावत नाहीत. त्यात सततच्या इंधन दरवाढीमुळे दुहेरी फटका एसटी महामंडळाला बसत आहे. तोटा कमी करण्यासाठी महामंडळाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, सर्वात महत्वाचे प्रवासी नससल्याने या प्रयत्नाला यश येत नाही आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाने 17 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव सुद्धा तयार केलेला आहे. नुकताच एसटी महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली आहे. या प्रस्तावाला बैठकीत मान्यताही देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

इंधन दरवाढीमुळे 2 कोटीचा फटका

एसटी महामंडळाच्या 18 हजार बसेसपैकी सध्या फक्त 10 हजार बसेस राज्यभरात धावत आहेत. तसेच आता इंधन दर वाढीमुळे या बसेस चालविण्यासाठी महिन्याला दोन कोटी रुपयांचे खर्च वाढला आहे. राज्यातील सर्व गाड्या सुरू झाल्यास एसटीला मोठा फटका बसण्याचे चिन्ह दिसून येत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत'ने एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी विचारले असता ते म्हणाले, 17 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यावर अंतिम निर्णय अद्यापही झालेला नाही.

भाडेवाढीचा चेंडू परिवहन मंत्र्यांकडे

एसटी महामंडळाने भाडे वाढीच्या प्रस्ताव हकीम समितीकडे पाठविण्यात आलेला आहे. या समितीने मंजूरी दिली तरी, अंतिम निर्णय परिवहन मंत्री अनिल परब घेणार आहेत. मात्र, सध्या तरी मुंबई-उपनगरातील नागरिकांसाठी लोकल सेवा बंद आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेसवर मोठ्या प्रवासी अवलंबून आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या भाडे वाढ केली तर नागरिकांमध्ये असंतोष वाढण्याचे चिन्ह आहे. त्यामुळे तूर्तास भाडेवाढीचा निर्णय होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा - गरिबांच्या आवाजासाठी बैलगाडीचे असे अनेक अपघात सहन करू - भाई जगताप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.