मुंबई - भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. नाना पटोले यांचे आयुष्य कोलांडी मारण्यात गेले आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, असा त्यांचा स्वभाव आहे. त्यामुळे कोणीही त्यांना गांभीर्याने घेत नाही, असे त्यांनी म्हटले. रेमडेसिवीरच्या काळाबाजाराला केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला होता.
फडणवीस यांच्या राजकीय विधानाचा गंभीर इशारा समजावा -
स्वतःच्या अपयशाचे खापर दुसऱ्यांवर फोडता येणार नाही. फडणवीस यांच्या राजकीय विधानाचा गंभीर इशारा समजावा. शिवसेना पक्ष किंवा खासदार राऊत यांची बेळगाव आणि बंगालच्या निवडणुकीवर बोलण्याची औकात नाही. या कोरोनाच्या काळात आम्हाला राजकारण करायचे नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले.