ETV Bharat / state

मुंबईत गॅस गळती,  गळतीचा उगम शोधण्यात यावेळीही अपयश - महानगर गॅस बातमी

मुंबईच्या अग्निशमन दलाने यूएस विटामिन, गोवंडी तसेच पंत नगर पोलीस ठाणे परिसरात शोध घेतला पण, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गॅसगळती आढळून आली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

edited photo
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Jun 7, 2020, 7:51 AM IST

Updated : Jun 7, 2020, 9:30 AM IST

मुंबई - गॅस गळतीच्या तक्रारीनुसार मुंबईच्या अग्निशमन दलाने यूएस विटामिन, गोवंडी तसेच पंत नगर पोलीस ठाणे परिसरात शोध घेतला पण, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची गॅस गळती आढळून आली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. यामुळे यंदाही गॅस गळतीचा उगम शोधण्यात अग्निशमन दलाला अपयश आले आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूर, घाटकोपर, कांजूरमार्ग, पवई आदी विभागात रात्री पावणे बारा-वाजताच्या सुमारास गॅसचा वास येऊ लागला. त्यामुळे गॅस गळती झाली असल्याची शंका उपस्थित केली जाऊ लागली. गॅसचा उग्र वास येत असल्याने या विभागांमधून मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाकडे गॅस गळतीच्या तक्रारी अनेकांनी नोंदवल्या होत्या.

गॅस गळतीची तक्रार आल्यानंतर त्या विभागात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई अग्निशमन दलाने 17 फायर इंजिन (अग्निशमन बंब) तैनात केल्या आहेत. तसेच मुंबईमधील एचपीसीएसल, बीपीसीएल, महानगर गॅस, आरसीएफ, आणि पोलिसांनाही गॅस गळतीची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. हा वास नेमका कसला होता त्याचा अद्यापही शोध लागलेला नाही.

या आधीही घडले होते प्रकार -

मुंबईत या आधीही गॅसचा उग्र वास येत असल्याचे प्रकार घडले आहेत. त्याचा शोध घेतल्यावर आणि चौकशी केल्यावर काहीही निष्पन्न झालेले नाही. मुंबईत असलेल्या रिफायनरी आणि गॅस कंपनीमधून गॅस गळती होत असल्याचा आरोप मुंबईकर नेहमीच करत आले आहेत. मात्र, या कंपन्यांकडून अशी गळती झाली नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे हा गॅसचा उग्र वास नेमका कोणता याचे उत्तर कधीच मिळालेले नाही. मागील वर्षीही असाच प्रकार घडल्यावर सर्व यंत्रणांची चौकशी समिती नेमली त्यामधूनही काहीही निष्पन्न झालेले नाही.

हेही वाचा - #गो_ब‌ॅक_कोश्यारी.. राज्यपालांच्या विरोधात विद्यार्थी संघटना एकवटल्या; समाज माध्यमांवर जोरदार मागणी

Last Updated : Jun 7, 2020, 9:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.