मुंबई - 14 एप्रिल संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता शासनाने 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. मुंबईतील दादर परिसरात असलेले राजगृह हे बाबासाहेबांचे निवासस्थान म्हणजे आंबेडकरी जनतेसाठी जणू तीर्थक्षेत्र आहे. दर 14 एप्रिलला बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने राजगृहावर मोठ्या संख्येने अनुयायी येतात आणि अभिवादन करतात. परंतु कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारने लावलेली निर्बंध आणि जनतेला केलेल्या आवाहनाला अनुयायांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. राजगृह परिसरात अनुयायांनी निर्बंध आणि नियमांचे पालन करत मुळीच गर्दी न करता मोजके अनुयायी राजगृहाजवळ पहायला मिळाले. कायद्याचे पालन करत अनुयायांनी महामानवाला घरूनच अभिवादन केले आहे.
हेही वाचा-चरीच्या शेतकरी संपामुळे देशात कुळ कायदा झाला लागू
हेही वाचा-डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन