मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये विविध आंदोलनांनी वेग घेतला आहे. मुंबईतील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागी उर्दू भवन का बांधण्यात ( Urdu Learning Center in Place Industrial Training Institute ) आले. त्याबाबत आगरी पाडा संघर्ष समितीच्यावतीने आयोजित केलेल्या आंदोलनात नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेवर हल्लाबोल केलेला ( MLA Nitesh Rane Oppose Urdu Learning Centre )आहे. त्यांनी उर्दू भवन बांधण्याला विरोध दर्शवत मुंबई महापालिकेवर आणि तत्कालीन शासनावर टीका केली.
मुंबईकरांचे प्रश्न प्रलंबित : आगरी पाडा एमटीएनएल कार्यालयाच्या बाजूला औद्योगिक प्रशिक्षण संस्था बांधण्यात येणार होती. मात्र ही औद्योगिक शिक्षण संस्था न बांधता त्या जागी उर्दू लर्निंग सेंटर उभारण्याचं सुरू आहे. हे कोणाच्या सांगण्यावरून सुरू आहे आणि मुंबई महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारावर त्यांनी टीका केली. मुंबईमध्ये पाऊस पडतो, नाले भरले जातात, सामान्य माणसांना वाचवायला मुंबई महानगरपालिका तात्काळ धावत (Mumbaikars Problem Pending ) नाही. मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या जागी उर्दू लर्निंग सेंटर कसे काय तात्काळ उभे राहते. हे जनतेला समजलेच पाहिजे असा प्रश्न देखील त्यांनी या आंदोलनात केला.
मोठ्या संख्येने हिंदू लोक राहतात : या भागामध्ये मोठ्या संख्येने हिंदू लोक राहतात ( Hindus People More In Mumbai ) आणि हिंदू लोक राहत असताना देखील उर्दू भवन या ठिकाणी बांधण्याचे कारण काय याचं उत्तर तत्कालीन सरकार आणि प्रशासनाने दिले पाहिजे. तत्कालीन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबई महानगरपालिकेने अडीच वर्षात कधी जनतेला तात्काळ सेवा दिली नाही मात्र उर्दू भवन बांधण्याच्या कामे इतक्या जलद गतीने निर्णय घेतला गेला निधी मंजूर केला आणि बांधकामही करण्यात आलं याचे उत्तर तात्कालीन सरकारने दिलेच पाहिजे. असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका ( MLA Nitesh Rane ) केली.