मुंबई Nitesh Rane on Sanjay Raut : भाजपाकडं नैतिकता औषधलाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचं ऑडिट होणं फार गरजेचे आहे, असा टोला उबाठा गटाचे खासदार, संजय राऊत यांनी भाजपाला लगावला होता. संजय राऊत यांच्या विधानानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. भाजपाच्या नैतिकतेविषयी संजय राऊत सारख्या खिचडी चोराचा आरोप असलेल्यांच्या सल्ल्याची गरज नाही, असा हल्लाबोल त्यांनी मुंबईत केला आहे.
65 आमदारावरून 15 वर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाच्या नैतिकतेवर भाष्य केलं आहे. भाजपाकडं नैतिकता औषधालाही शिल्लक राहिली नसून त्यांच्या नैतिकतेचं ऑडिट करण्याची गरज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांच्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. नैतिकतेचं ऑडिट कुणी करावं याचे नियम असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल संजय राजाराम राऊत वाटेल ते बोलत आहेत. जनतेनं भाजपाला मतदानाच्या रुपात मोठा आशीर्वाद दिला आहे. त्यामुळं भाजपा खासदारांची संख्या 2 खासदारावरून 300 वर पोहचली. तर ठाकरे गटाची संख्या 56 आमदारावरून 15 वर आली आहे. फडणवीस यांचं नागपूरचे महापौर ते आज पर्यंतच्या प्रवासाविषयी जनतेनं ऑडिट केलं आहे. त्यामुळं आम्हाला खिचडी चोरांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं आहे. तसंच हिंदुत्वाचं ऑडिट संजय राजाराम राऊत करू शकत नाहीत. कधीतरी तुमच्या कुटुंबात तुमचं काय स्थान आहे? याचंही ऑडिट करा, असंही राणे म्हणाले.
सगळी लफडी बाहेर काढीन : राणे पुढे म्हणाले की, ज्या कुटुंबाचं पोट कोविड खिचडी घोटाळ्यावर भरतं, त्याचं ऑडिट करावं. हॉटेल हयातचं बिल कोण भरत? बातम्यांमध्ये राहण्यासाठी संजय राजाराम राऊत काहीही बोलत असतात. 2010 ला निलेश चव्हाणनं आत्महत्या केली, असं दाखवण्यात आलं. याची चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या दबाबाखाली ही आत्महत्या केली. याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांंच्यावर एका महिलेवर गँग रेप तसंच मर्डरचा केल्याचा आरोप आहे. इकडं तुम्ही ऑडिटची भाषा बोलता. राणे तसंच राज ठाकरे यांना एकत्र बसवून तुमच्या मालकाची सगळी लफडी बाहेर काढीन, असा धमकीवजा इशाराही नितेश राणे यांनी राऊत यांना दिला आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मातोश्रीची सफाई केली आहे. त्यांनी अजून सफाई केली, तर काहीच शिल्लक राहणार नाही, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा -