ETV Bharat / state

Nitesh Rane Vs Sanjay Raut: संजय राऊत यांच्यानंतर नितेश राणेंची युनोला विनंती... 'हा' दिवस देशद्रोही दिन घोषित करण्याची मागणी

शिवसेनेचे पक्षाचा वर्धापन दिन ठाकरे गटाकडून आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून जोरदार मुंबईत साजरा करण्यात आला. त्यातच 20 जून हा जागतिक गद्दार दिन घोषित करावा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी युनो ला पत्र लिहून केली आहे. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून घोषित करावा, अशी विनंती ट्विटद्वारे युनोला केली आहे.

Nitesh Rane Vs Sanjay Raut
उद्धव ठाकरेंचा वाढदिवस देशद्रोही दिन
author img

By

Published : Jun 20, 2023, 1:54 PM IST

मुंबई : 27 जुलै हा देशद्रोही दिवस म्हणून साजरा करायला हवा. त्यासाठी युनोनी आम्हाला मान्यता द्यावी. 27 जुलै दिवस उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस आहे. अशा प्रकारचा गद्दार पुन्हा एकदा कधी जन्माला येणार नाही, अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या वडिलांसोबत गद्दारी केल्याचा दावा आमदार राणे यांनी केला. वडिलांचे हाल केले. त्याच्या विचारांशी बेइमानी केली.

वडील असो सक्खा भाऊ असो चुलत भाऊ असो, ते स्वतःच्या कुटुंबाचे कधी झाले नाहीत. त्यांच्या प्रत्येक क्षणी गद्दारी आणि द्रोहशिवाय उद्धव ठाकरे यांना काही सुचले नाही. स्वतःच्या हिंदू धर्माशी यांनी बेइमानी केली. भारतीय जनता पक्षाने इतके लाड करत सांभाळले. मुख्यमंत्री पदाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे हिंदुत्वाशी गद्दारी करून उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. देवेंद्र फडणवीसांनी 2014 ते2019 पर्यंत सख्या भावासारखा उद्धव ठाकरेंना सांभाळले. जी भाषा संजय राऊत यांची तीच भाषा उद्धव ठाकरेंची आहे. उद्धव ठाकरे घाणेरड्या वृत्तीचा माणूस असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याच्या इच्छेसाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपासारखा मित्राच्या पाठीत वार केला. भ्रष्टाचार करून पैसे कमवले आणि आपल्याच माणसाच्या पाठीत खंजीर खूपसला-आमदार नितेश राणे

मोठा 'अवली' उद्धव ठाकरे : चांगले विचार देण्यासाठी वर्धापन दिन साजरा केला जातो. महाराष्ट्रात सर्वात मोठा 'अवली' उद्धव ठाकरे आणि त्याचा मुलगा 'कवली' आहे, अशी एकेरी भाषेत आमदार राणे यांनी टीका केली. पुढे ते म्हणाले, की परवाच्या सभेत थयथयाट मागील कारण कॅगचा अहवालनुसार होणारी कारवाई आहे. ठाकरे आणि पाटणकर यांचे सत्य बाहेर येणार आहे. 25-30 वर्षे मुंबईला कसे लुटले त्याचे प्रेझेन्टेशन आदित्य ठाकरे यांनी दाखवावे. 33 देशांत ठाकरेंचे पैसे आहेत. हे पैसे नंदकिशोर चतुर्वेदीने लपवले असल्याचा आरोप राणे यांनी केला आहे.

हिंदू धोक्यात: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब कळले असते तर दोन वर्धापनदिन झाले नसते. मुंबई पालिकेतील मस्ती बाहेर येणार संजय यांचा मालक जेलमध्ये जाणार आहे. अडीच वर्षे महाविकास आघाडीच्या काळात धर्मांतर लव्ह जिहाद लँड जिहाद माध्यमातून हिंदू धोक्यात आहेत. संजय राऊत यांच्या मालकाने हिंदूंशी गद्दारी केली, म्हणून आम्हाला हिंदूजन आक्रोश मोर्चा काढावा लागतो.

बाळासाहेब कळले असते तर... मुंबईत बांगलादेशी रोहींगे वाढले. ठाकरेंच्या सत्ता काळात बेहराम पाडा मालवणी भागात त्यांना वीज व पाणी मुंबई पालिकेने पुरविले. पक्षात राहून उद्धव ठाकरेंना कोण संपवत असेल तर ते संजय राऊत आहेत. विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता पण येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखवून 2017 ला मुंबईत सेनेचा महापौर बसवला होता. मोदी यांच्या नेतृत्वात भारताने लस तयार करून जगाला दिली. हे बालबुद्धीच्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही.

20 जून गद्दार दिन साजरा करण्याची संजय राऊत यांनी केली मागणी: एकनाथ शिंंदे यांनी 20 जूनला बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट झाली. त्यांच्या बंडामुळे ४० आमदारांनी गद्दारी केली, असा आरोप करत संजय राऊत यांनी 20 जून गद्दार दिन साजरा करण्याची थेट संयुक्त राष्ट्रसंघाकडे ट्विट करत मागणी केली. त्याचबरोबर त्यांनी ट्विटमध्ये पत्रदेखील जोडले आहे. संजय राऊत यांच्या मागणीमुळे राजकारणात पडसाद उमटल्याचे दिसत आहे.

हेही वाचा-

  1. Maharashtra Politics: शिवसेनेतील बंडाची धग कायम...राष्ट्रवादी, ठाकरे गट व शिंदे गटाकडून वेगवेगळे दिन साजरे
  2. Sanjay Raut on Shiv Sena Anniversary : गद्दारांना मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही - संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.