मुंबई - आमदार नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. जग चाललंय 5-जी कडे पण सिंधुदुर्ग चाललाय 3- जी कडे, निवडून दिलेल्या खासदारांचे काय वजन असे म्हणत नितेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली आहे.
बीएसएनएलने 4-जी सेवेतून सिंधुदुर्ग जिल्ह्याला वगळले आहे. यावरुन नितेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर टीका केली. कपाळावर मुकुट आणि खालसून नागडो असे म्हणत नितेश राणेंनी विनायक राऊतांची खिल्ली उडवली आहे.