ETV Bharat / state

Nitesh Rane : आदित्य ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतर नितेश राणेंनी 'हे' दिले आव्हान

author img

By

Published : Oct 23, 2022, 9:20 AM IST

नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुरुषी आवाजात बोलण्याचे आव्हान केले (Nitesh Rane challenge Aditya Thackeray) आहे. आदित्य ठाकरेंच्या राणे साहेबांना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का ? या प्रश्नाला त्यांनी प्रत्युत्तर दिलेले (Nitesh Rane criticize Aditya Thackeray)आहे.

Nitesh Rane challenge  Aditya Thackeray
नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबई : शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि राणे कुटुंबामध्ये नेहमीच शाब्दिक वाद होत असल्याचे दिसून येत आहे. यात पुन्हा भर पडली आहे. नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना पुरुषी आवाजात बोलण्याचे आव्हान केले (Nitesh Rane challenge Aditya Thackeray) आहे. आदित्य ठाकरेंच्या राणे साहेबांना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का ? या प्रश्नाला त्यांनी प्रत्युत्तर दिलेले होते. त्यावर राणे यांनी ट्विट करत म्हटले, 'हे' विचारण्या अगोदर आदित्यने आपलं पूर्ण नाव 'पुरुषाच्या' आवाजात बोलून (Aditya Thackeray to speak in Male voice) दाखवावे. असे ते म्हणाले.

काय होते आदित्य ठाकरेंचे वक्तव्य : शिवसेना आमदार आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिव्यांग मुलांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांना पत्रकारांनी नारायण राणे यांची टीका, राज्य सरकार, शेतकरी मदत, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट यासंदर्भात भाष्य केले होते. नारायण राणे यांची ती १६ वर्षात सवय झाली आहे. विविध पक्षात जाऊन जी मंत्रिपदं भोगली, त्यातील एक चांगंल काम सांगावं किंवा त्यांनी त्यांच्या खात्याचा फुलफॉर्म सांगावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यालाच राणेंनी प्रत्युत्तर दिले (Nitesh Rane criticize Aditya Thackeray) आहे.

  • राणे साहेबांना त्यांच्या मंत्रालयाचा फुलफॉर्म येतो का हे विचारण्या अगोदर..
    आदित्यने आपलं फुल नाव “पुरुषाच्या “ आवाजात बोलून दाखवाव..

    Challenge accepted ?

    — nitesh rane (@NiteshNRane) October 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली होती टीका- राज्यात मुंबई महापालिकेत सत्ता येण्यासाठी शिंदे सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच, ठाकरे गटाकडून देखील शिंदे सरकारवर टिका केली जात आहे. यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गट कुठ राहिला आहे. तो तर संपला आहे. आता शिवसेना कुठ राहिली आहे. 56 वरून आत्ता 6 ते 7 च जण राहिले आहेत. त्यामधीलही चारजण माझ्या संपर्कात आहेत अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यामांंशी बोलत होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.