बीड Hiv Test Before Marriage : 'एचआयव्ही'सारख्या भयानक रोगाचा जगात फैलाव थांबविण्यासाठी आसरडोह नगरपंचायतीनं सकारात्मक पाऊल उचललं आहे. लग्नाआधी मुला-मुलींची 'एचआयव्ही' चाचणी (Hiv Test Mandatory Beed) अनिवार्य करण्याचा निर्णय या ग्रामपंचायतीनं (Asardoh Grampanchayat in Beed) घेतलाय.
एचआयव्ही चाचणी अनिवार्य : लग्नापूर्वी मुला-मुलींची एचआयव्ही चाचणी अनिवार्य करण्याचा निर्णय धारूर तालुक्यातील असरडोह ग्रामपंचायतीनं घेतलाय. आसरडोह ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल आबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एचआयव्ही संदर्भात जनजागृतीचा ठराव करण्यात आला. असा ठराव घेणारी आसरडोह ग्रामपंचायत ही राज्यातील पहिलीच ग्रामपंचायत असल्याची माहिती सरपंच मंगल आबासाहेब देशमुख यांनी दिली.
जनजागृती वाढेल : या ठरावात ग्रामपंचायत क्षेत्रात होणाऱ्या मुला-मुलींची लग्नापूर्वी एचआयव्ही तपासणी करणं अनिवार्य करण्यात आलंय. या ठरावाचं सर्वत्र कौतुक होत असून, एचआयव्हीबाबत जनजागृती वाढेल आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायतींनाही असा निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना आसरडोह गावातील ग्रामस्थांनी व्यक्त केली. हा ठराव राजेसाहेब आबासाहेब देशमुख यांनी सुचवला होता.
एचआयव्ही विषाणूबाबत जाणून घ्या : WHO च्या माहितीनुसार, 1983 मध्ये पहिल्यांदा एचआयव्ही विषाणूचा शोध लागला. त्यानंतर तब्बल 79.3 दशलक्ष नागरिकांना या विषाणूची लागण झाल्याचं उघड झालं. एचआयव्ही या संसर्गाचा गंभीर परिणाम आणि उच्च मृत्यू दर लक्षात आल्यापासून डॉक्टर, शास्त्रज्ञांसह सामाजिक संघटनाकडून या आजाराबद्दल नागरिकांमध्ये जागरूकतेसाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. एचआयव्हीपासून बचाव करण्यासाठी लस शोधण्यासाठीही सातत्यानं प्रयत्न सुरू असून त्यात अद्याप पूर्णपणं यश आलेलं नाही.
हेही वाचा