मुंबई Car Accident of Indian Cricketer : भारतीय क्रिकेटर सरफराज खानचा भाऊ मुशीर खान हा रस्ता अपघातात जखमी झाला आहे. मुशीर खानच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. मुशीर त्याचे वडील नौशाद खान यांच्यासोबत आझमगडहून लखनऊला जात असताना हा अपघात झाला. अपघाताचं कारण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेलं नाही. परंतु, कार रस्त्यावर 4-5 वेळा उलटली, त्यामुळं मुशीर गंभीर जखमी झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
Musheer Khan suffers a fracture in a road accident in UP. He's set to miss the Irani Cup and the initial phase of the Ranji trophy. (TOI).
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
- Wishing Musheer a speedy recovery! pic.twitter.com/lZaLJmjniC
सहा आठवडे राहणार क्रिकेटपासून दूर : आता मुशीर किमान 6 आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. मुशीरला परत येण्यासाठी 3 महिने लागू शकतात. या दुखापतीमुळं मुशीरचं इराणी ट्रॉफीतून बाहेर पडणं निश्चित आहे. सर्फराज खानचं कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील आझमगडचं आहे. येथील सागधी तालुक्यात बसुपर हे त्यांचं गाव आहे.
The BCCI confirms Musheer Khan is stable, conscious and well-oriented.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2024
- He'll be flown to Mumbai for further assistance once fit to travel. pic.twitter.com/BhTS5e9w5N
दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणातच केली मोठी खेळी : दुलीप ट्रॉफी 2024 मध्ये मुशीर खाननं फलंदाजीत कहर केला होता. त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच, मुशीरने इंडिया-बी कडून इंडिया-ए विरुद्ध 181 धावांची इनिंग खेळली. यात त्यानं 373 चेंडूंचा सामना केला आणि 16 चौकारांसह 5 षटकार ठोकले. दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पण करताना किशोरवयीन (20 वर्षांखालील) ही तिसरी सर्वोच्च धावसंख्या होती. मुशीरनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागं टाकलं. ज्यानं 1991 मध्ये दुलीप ट्रॉफी पदार्पणात 159 धावा केल्या होत्या. या बाबतीत बाबा अपराजित अव्वल आहे, ज्यानं दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणात 212 धावा केल्या होत्या. दुसऱ्या क्रमांकावर यश धुल आहे, ज्यानं 193 धावा केल्या आहेत.
BCCI नं काय म्हटलं : BCCI नं जारी केलेल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटलं आहे की, '19 वर्षीय टॉप ऑर्डर बॅट्समन आणि डावखुरा फिरकीपटू मुशीर खान शुक्रवारी 27 सप्टेंबर 2024 रोजी आपल्या कुटुंबासह आझमगढ ते लखनऊला जात असताना रस्ता अपघाताचा बळी ठरला. 1 ते 5 ऑक्टोबर 2024 दरम्यान होणाऱ्या आगामी इराणी चषकात सहभागी होण्यासाठी तो लखनऊला जात होता.'
🚨 MEDICAL UPDATE 🚨
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) September 28, 2024
Wishing our star Musheer Khan a speedy recovery who was involved in a road accident while travelling to Lucknow yesterday!
Read more 👉 https://t.co/FHN8C5K7zf#MCA #Mumbai #Cricket #Wankhede #BCCI
मानेला झालं फ्रॅक्चर : मुशीरला सध्या लखनऊ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्या मानेला फ्रॅक्चर झालं असून त्याला निरीक्षणात ठेवण्यात आलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) ची वैद्यकीय पथकं त्याच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत, जेणेकरुन त्याला सर्वोच्च पातळीवरील काळजी मिळेल. जेव्हा मुशीर वैद्यकीयदृष्ट्या प्रवासासाठी योग्य असल्याचं मानलं जाईल, तेव्हा त्याला पुढील संक्रमण आणि अतिरिक्त वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला नेण्यात येईल. त्यानंतरच त्यांच्यावर पुढील उपचार केले जातील, असं BCCI नं म्हटलं आहे.
मुशीरवर कायदेशीर कारवाई होणार का? : एमसीएच्या एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर ईटीव्ही भारतला सांगितलं की, "संघासोबत प्रवास न करण्याची मुशीरची कृती 'अनुशासनहीन' मानली पाहिजे. आजकाल पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची सोय, विमान प्रवास इत्यादी सर्व सुविधा राज्य संघटनांकडून वयोगटातील खेळाडूंना पुरविल्या जातात. एखाद्या खेळाडूनं संबंधित राज्य संघटनेच्या परवानगीशिवाय स्वत:हून प्रवास केल्यास त्याला शिक्षा व्हायला हवी. फक्त मुशीर का, हे सर्व खेळाडूंना लागू झाले पाहिजे. एक काळ असा होता की राज्य संघटनेच्या खेळाडूंना स्वतःचे पैसे खर्च करावे लागायचे, पण आता परिस्थिती खूप बदलली आहे."
हेही वाचा :