मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात ( Santosh Parab Attack Case ) आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर आमदार नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज शुक्रवार (दि 07) रोजी नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीत नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला ( Nitesh Rane not relieved by Mumbai High Court ) नाही. आज राणे यांच्या याचिकेवर ऑनलाइन पद्धतीने सुनावणी झाली आहे. त्याचबरोबर आता नितेश राणे यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी बुधवारी (दि.12) होणार आहे.
मागील सुनावणी वेळी न्यायालयाने राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे सांगितले होते. तसेच संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक ( Shiv Sena aggressive in Santosh Parab attack case ) झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत. नितेश राणेंनी ( MLA Nitesh Rane ) मुंबई उच्च न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केला आहे. तसेच तातडीची सुनावणी घेण्यासंदर्भात न्यायालयाला विनंती केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयात मागील सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी नितेश राणे यांच्यावर पुढील सुनावणी पर्यंत कुठलीही कठोर कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते. मात्र आज ऑनलाइन पद्धतीने सुनावणी झाली. ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही
सिंधुदुर्गमध्ये राणे विरुद्ध शिवसेना
कोकणामध्ये राणे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष गेल्या अनेक वर्षांपासून पाहायला मिळत आहे. तो पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला. या निवडणुकीत राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला होता. मात्र या निवडणुकीत राणे गटाच्या 11 जागा
निवडून आल्या आणि त्यांचा मोठा विजय झाला. तसेच शिवसेनेच्या हातात असलेली सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँक आता नारायण राणे यांच्या गटाकडे आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा कोकणामध्ये नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे.