मुंबई - राज्यात रविवारी (दि. १८ जुलै) ९ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. १ जुलैला ९ हजार १९५ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, आज पुन्हा ९ हजार रुग्ण आढळून आले आहेत.
५ हजार ७५६ रुग्ण बरे
राज्यात रविवारी ५ हजार ७५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ५९ लाख ८० हजार ३५० जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के एवढे झाले आहे. आज १८० कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ५४ लाख ८१ हजार २५२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख १४ हजार १९० (१३.६६
टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ६७ हजार ५८५ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर ४ हजार ६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईन आहेत. राज्यात आज (रविवार) एकूण १ लाख ३ हजार ४८६ सक्रिय रुग्ण आहेत.
मृत्यूदर स्थिर
राज्यात आज १८० मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४ टक्के एवढा आहे. गेले काही दिवस राज्यातील मृत्यूदर स्थिर आहे. यापूर्वी मृत्यूदर २.०३ ते २.०१ टक्के होता.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४५५
रायगड - ३७८
अहमदनगर पालिका - ६४५
पुणे - ५४५
पुणे पालिका - ३७८
सोलापूर - ३७७
सातारा - ७८३
कोल्हापूर - २ हजार ५२
सांगली - ८२४
रत्नागिरी - २१२
हेही वाचा - छातीत दुखत असल्याने महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल