मुंबई - रविवारपासून राज्यात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. आदिशक्तीच्या जागर म्हणून नवरात्रीचा उत्सव जल्लोषात साजरा केला जात आहे. मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर या उत्सवात विविध रंगांनी उजळून निघाले आहे.
नवरात्रीच्या नऊ दिवस सिद्धीविनायक मंदिरावर नऊ रंगांची विद्यूत रोषणाई करण्यात येणार आहे. सिद्धीविनायक मंदिरही आदिशक्तीच्या प्रकाशात उजळून निघेल, अशी माहिती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली.
हेही वाचा - आदित्य ठाकरे 3 ऑक्टोबरला भरणार उमेदवारी अर्ज?
शारदीय नवरात्र उत्सव मुंबईत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळात देवीचे आगमन झाले आहे. मुंबईच्या सिद्धीविनायक मंदिरात नऊ दिवसातील नऊ रंगांची रोषणाई आकर्षण ठरणार आहे.