मुंबई - महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून त्यांच्या कारभारावर राणे कुटुंब सातत्याने टीका करत आहे. कर्जमाफीच्या मुद्यावरुन माजी खासदार निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर निशाणा लगावला. ठाकरे सरकार इतर कुठला कारखाना उभारणार की नाही माहीत नाही, पण चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासून सुरु केल्याचे म्हणत सरकारवर त्यांनी टीका केली.
-
इतर कुठला कारखाना ठाकरे सरकार उभारणार की नाही माहीत नाही पण चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासून सुरु केला. अतिवृष्टी मुळे झालेली नुकसान भरपाई नाही, सरसकट कर्जमाफी नाही, २ लाख कर्जमाफीची स्पष्टता नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">इतर कुठला कारखाना ठाकरे सरकार उभारणार की नाही माहीत नाही पण चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासून सुरु केला. अतिवृष्टी मुळे झालेली नुकसान भरपाई नाही, सरसकट कर्जमाफी नाही, २ लाख कर्जमाफीची स्पष्टता नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2019इतर कुठला कारखाना ठाकरे सरकार उभारणार की नाही माहीत नाही पण चुना लावायचा कारखाना पहिल्या दिवसापासून सुरु केला. अतिवृष्टी मुळे झालेली नुकसान भरपाई नाही, सरसकट कर्जमाफी नाही, २ लाख कर्जमाफीची स्पष्टता नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) December 22, 2019
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना २ लाखांची कर्जमाफी जाहीर केली आहे. ही कर्जमाफी विनाअट असणार आहे. मात्र, या कर्जमाफीवरुन निलेश राणेंनी ट्वीटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका केलीय. ठाकरे सरकारने सरसकट सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तसे होताना दिसत नाही. २ लाखांची कर्जमाफी केली आहे. त्यातही स्पष्टता नसल्याचे निलेश राणेंनी म्हटले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे झालेली नुकसान भरपाई अद्यापही मिळाली नसल्याचे राणे म्हणाले.