मुंबई NIA Crackdown On PFI : विक्रोळी इथं एनआयएचं धाडसत्र सुरू आहे. मुंबईत झालेल्या 7/11 रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपीच्या घरावर ही छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई शहरात झालेल्या 7/11 बॉम्बस्फोटातील निर्दोष आरोपी वाहिद शेख याच्या घरावर एनआयएनं (NIA ) ही छापेमारी केली आहे. वाहिद शेख याच्या घरावर आज सकाळपासूनच एनआयची छापेमारी सुरू आहे. पीएफआयशी ( Popular Front of India ) संबंधित प्रकरणावरुन ही छापेमारी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एनआयची देशभरात छापेमारी : पीएफआयशी संबंधित प्रकरणात एनआयएनं देशभरात छापेमारी केली आहे. एनआयएचे अधिकारी सकाळपासूनच या छापेमारीत गुंतले आहेत. पीएफआय या दहशतवादी मॉड्यूलचे धागेदोरे एनआयएनं खोदून काढले आहेत. त्यामुळे मुंबईतील विक्रोळी परिसरात वाहिद शेख याच्या घरावर एनआयएनं छापेमारी सुरू केली आहे. एनआयएनं एकाच वेळी देशातील अनेक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. यात मदुराईचाही समावेश आहे.
काय आहे प्रकरण : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं मागील वर्षी दिल्लीतील बलिरामन परिसरात मागील वर्षी दहशतवादी कारवाई केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणात यूएपीए अंतर्गतही एनआयएनं गुन्हा दाखल केला होता. त्याचा तपास करत असताना राष्ट्रीय तपास यंत्रणेला तामिळनाडू आणि महाराष्ट्रात धागेदोरे मिळाले आहेत. त्यामुळे एनआयएनं मदुराई आणि मुंबईत आज सकाळपासून छापेमारी सुरू केली आहे.
वाहिद शेख सबळ पुराव्या अभावी निर्दोष सोडलेला आरोपी : मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या 7/11 बॉम्बस्फोट प्रकरणात वाहिद शेख हा आरोपी होता. मात्र न्यायालयानं त्याला निर्दोष सोडलं आहे. तेव्हापासून सुरक्षा यंत्रणा त्याच्यावर लक्ष्य ठेवून आहेत. त्यातच पीएफआयशी ( Popular Front of India ) संबंधित प्रकरणात संशयित ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली आहे. त्यात वाहिद शेख याच्या विक्रोळीतील घरावरही छापेमारी करण्यात येत आहे.
हेही वाचा :