ETV Bharat / state

Rana Kapoor Bail : डीएचएफएल फसवणूक प्रकरण, राणा कपूर यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी - येस बँकेचे माजी एमडी राणा कपूर

येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर ( Rana Kapoor Bail Petition ) यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात ( Special PMLA Court Mumbai) सुनावणी होणार होती. मात्र न्यायाधिश गैरहजर ( Rana Kapoor Bail Petition hearing ) असल्याने ही सुनावणी पार पडली नाही. आता राणा कपूर यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 10 जानेवारीला होणार आहे.

Special PMLA Court Mumbai
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Dec 30, 2022, 7:56 PM IST

मुंबई - येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर ( Rana Kapoor Bail Petition ) यांची पत्नी बिंदू कपूर यांच्या मालकीच्या दिल्लीतील मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या एफआयआरच्या आधारे ईडीनेही ईसीआर दाखल करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात राणा कपूर यांना अटक देखील करण्यात आले होते. या प्रकरणात जामीन मिळवण्यासाठी राणा कपूर यांनी मुंबई सत्र न्यायालयातील ( Mumbai Session Court ) विशेष पीएमएलए कोर्टात ( Special PMLA Court Mumbai) अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी होणार होती, मात्र न्यायाधीश गैरहजर असल्याने आज सुनावणी ( Rana Kapoor Bail Petition hearing ) होऊ शकली नाही. या प्रकरणात पुढील सुनावणी 10 जानेवारी रोजी होणार आहे.

थापर यांच्या फर्मला बेहिशेबी कर्ज येस बँकेचे माजी एमडी राणा ( Yes Bank Ex MD Rana Kapoor Bail Petition ) कपूर यांची पत्नी बिंदू कपूर यांच्या मालकीच्या दिल्लीतील मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग मुंबईत स्वतंत्रपणे करत आहे. त्यानंतर सीबीआयने ( CBI ) दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने राणा कपूर, गौतम थापर आणि इतरांविरोधात तपास सुरू केला. तर दुसरीकडे, थापर यांच्या फर्मला बेहिशेबी कर्ज आणि सवलती दिल्यानंतर राणा कपूर यांनी दिल्लीतील अवंथा रियाल्टी लिमिटेड या मालमत्तेच्या रूपात बेकायदेशीररित्या नफा मिळवून दिल्याचे सीबीआयने दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केलेले आहे.

नवी दिल्लीतील मोक्याच्या जागेवरील मालमत्ता हस्तांतरित राणा कपूरने एआरएलशी संगनमत करून नवी दिल्लीतील एका मोक्याच्या जागेवर असलेली मालमत्ता आपल्या पत्नीच्या मालकीच्या ब्लिस अ‍ॅबोड नावावरील फर्मला चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यास परवानगी दिली. राणा कपूरने ( Special PMLA Court Mumbai ) अवंथाच्या दोन समूह कंपन्यांमध्ये मासिक भाडे करार तयार केला आणि ती मालमत्ता बँकेकडे गहाण ठेवून येस बँकेकडून 400 कोटींचे कर्ज मंजूर केले. मात्र या मालमत्तेची मूळ किंमत 550 कोटी इतकी होती, असे ईडीने गेल्या वर्षी दाखल केलेल्या आरोपपत्रात नमूद केलेले आहे. या प्रकरणात राणा कपूर यांनी जामीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आज न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्यासमोर सुनावणी पार पडणार होती. मात्र न्यायाधीश गरज राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही.

काय आहे प्रकरण येस बँक - DHFL फसवणूक प्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने 26 एप्रिल 2020 रोजी वाधवान बंधूंना प्रथम अटक केली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. डीएचएफएलला येस बँक लिमिटेडकडून आर्थिक मदत देण्याच्या बदल्यात येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांनी गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप केला आहे. त्यानुसार एजन्सीने दावा केला की येस बँक लिमिटेडच्या माध्यमातून राणा कपूरने ( Rana Kapoor Bail Petition hearing ) DHFL च्या अल्पकालीन नॉन-कन्व्हर्टेबल डिबेंचरमध्ये 3,700 कोटी आणि DHFL च्या मसाला बाँडमध्ये 283 कोटी गुंतवल्याचे ED ने सांगितले. येस बँकेने DHFL मध्ये केलेल्या 3,983 कोटींच्या या गुंतवणुकीबरोबरच DHFL द्वारे कपिल वाधवन यांनी DOIT अर्बन व्हेंचर्स. प्रायव्हेट लिमिटेडला कर्जाच्या नावाखाली 600 कोटींचा किकबॅक दिला. ही कपूर यांच्या पत्नी आणि मुलींच्या मालकीची कंपनी आहे. वाधवान बंधूंनाही अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.