ETV Bharat / state

'बाळासाहेब ठाकरे दि. बा. पाटलांचेही नेते, म्हणून नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नावे देणे योग्य' - 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरून आता राजकारण पेटू लागले आहे. स्थानिक प्रकल्पग्रस्थांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा जोर धरला आहे. तर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावानुसार सिडकोने 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे हे दि. बा. पाटील यांचेही नेते आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव योग्य असल्याची भूमिका आघाडीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

mumbai
मुंबई
author img

By

Published : Jun 6, 2021, 7:59 PM IST

Updated : Jun 6, 2021, 10:54 PM IST

नवी मुंबई - नवी मुंबई, पनवेल, उरणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या नवी मुंबई विमानतळावरून आता राजकारण पेटू लागले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई विमानतळाला कुणाचे नावे द्यावे? हा कळीचा मुद्दा बनला आहे. नवी मुंबई विमानतळासाठी परिसरात ज्या महान व्यक्तीमत्वाचे योगदान आहे, अशी किमान तीन ते चार नावे पुढे आली होती. मात्र सिडकोने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे घोषित केले. त्यानंतर स्थानिक भूमिपुत्रांनी या नावाला विरोध केला आहे. तसेच, या विमानतळला माजी खासदार, प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, असा आग्रह धरला आहे. मात्र दि. बा. पाटील हे पूर्वी शिवसेनेत होते. बाळासाहेब ठाकरे हे दि. बा. पाटील यांचेही नेते आहेत. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव योग्य असल्याची भूमिका आघाडीच्या माध्यमातून घेण्यात येत आहे.

शिरीष घरत , शिवसेना जिल्हा अध्यक्ष

दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची स्थानिक भूमिपुत्रांची भूमिका

'नवी मुंबई शहरातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे दि. बा. पाटील यांचे नाव प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे. तसेच किल्लेगावठाण चौकात दि. बा. पाटील यांचा पुतळा उभारावा. या ठिकाणच्या चौकाला हुतात्मा चौक हे नाव द्यावे. तसेच नवी मुंबईत अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. यातील एकाही प्रकल्पाला सिडकोने दि. बा. पाटील यांचे नाव दिलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे. नवी मुंबईत त्यांचे स्मरण होईल अशी भव्य वास्तू उभारण्यात यावी', अशी मागणी अखिल आगरी परिषदेने केली आहे.

विमानतळाला हिंदूह्रदयसम्राटांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर

नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ डिसेंबरला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांना पत्र पाठवले. त्यात, सिडकोद्वारे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचे नामकरण 'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे करण्याचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. ४ जानेवारीला नगरविकास विभागाने सिडकोला पत्र पाठवून याबाबतचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर तत्काळ सादर करण्यास सांगितले होते. त्या अनुषंगाने नवी मुंबईतील विमानतळाला बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव संचालक मंडळाने मंजूर केला आहे.

सिडकोच्या भूमिकेमुळे प्रकल्पग्रस्त नाराज

विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत, त्या प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील आहेत. त्यामुळे त्यांचे नाव देणे योग्य, अशी भूमिका स्थानिक प्रकल्पग्रस्थांनी घेतली आहे. त्यामुळे सिडकोने घेतलेल्या नामकरणाच्या भूमिकेवर स्थानिक प्रकल्पग्रस्त नाराज आहेत.

हेही वाचा - मध्य रेल्वे मार्गावरील नाल्यांची सफाई; १५ ठिकाणी रुळाखालील कल्व्हर्टमधील काढला गाळ

Last Updated : Jun 6, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.