ETV Bharat / state

सरकारी कारकून, बांधकाम मजूर ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ - सरकारी कारकून, बांधकाम मजूर ते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ

आदिवासी समाजातील नेते नरहरी झिरवाळ यांचा विधानसभेत उलगडला जीवनपट... नरहरी झिरवाळ यांची विधानसभा उपाध्यक्षपदी शनिवारी निवड झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ
author img

By

Published : Mar 15, 2020, 9:11 AM IST

Updated : Mar 15, 2020, 9:50 AM IST

मंबई - तहसीलदार कार्यालयात कारकून... व्यवसाय करण्यासाठी सरकारी नोकरी सोडली... व्यवसायात जमले नाही म्हणून बांधकाम मजूर म्हणून काम... राजकारणात प्रवेश आणि थेट विधानसभा उपाध्यक्षपद... असा प्रवास नवे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष पुढील निवडणुकीत पराभूत होतो असा समज आहे. यामुळेच झिरवाळ यांना हे पद नको होते, पण आम्ही त्यांची भीती दूर केल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी झिरवाळ यांचा निवडीचा किस्सा सांगितला. शिरवळ यांच्या अनेक आठवणीला उजाळा देत अजित पवारांनी आपल्या मतदारसंघात लोकसभेला कमी मतदान देऊन विधानसभेत स्वतःसाठी मताधिक्य वाढवले, असा टोला माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडीनंतर लगावला.

सरकारमधील सत्तावाटपाच्या सूत्रानुसार विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्यावर पक्ष नेतृत्वाने दिंडोरीचे आमदार व आदिवासी समाजातील नेते नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिली. भाजपने माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उइके यांचा अर्ज मागे घेतल्याने झिरवाळ यांची बिनविरोध निवड झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झिरवाळ यांना आसनस्थ केले.

हेही वाचा - Coronavirus : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, मुंबईत आढळले आणखी 4 रुग्ण

यानिमित्ताने भाषणांतून झिरवाळ यांचा प्रवास उलगडला. झिरवाळ यांच्या रूपाने वंचित समाजात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हा मान मिळाला. त्यांना कीर्तनाची आवड आहे. पण, वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार नाही, मला ते जमत नाही, असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काढला.

झिरवाळ हे तहसीलदार कार्यालयात कारकून होते. ती नोकरी सोडून ते व्यवसायात पडले. पण तेथे त्यांना यश मिळाले नाही. परिस्थितीमुळेच त्यांना बांधकाम मजूर म्हणून काम करावे लागले. त्यातून ते आता या विधानसभेच्या उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्याचा प्रवास अजित पवार यांनी उलगडून सांगितला. तेव्हा सभागृहाने बाके वाजवून कौतुक केले. विधानसभेचा उपाध्यक्ष झाल्यावर पुढच्या निवडणुकीत पराभव होतो, अशी भीती झिरवाळ यांच्या मनात वसंत पुरके, विजय औटी यांच्यासह चौघांच्या अनुभवामुळे होती. पण मी त्यांना मधुकर चव्हाण हे उपाध्यक्ष झाल्यानंतर पुढच्या वेळी मंत्री झाल्याचे त्यांना सांगितले, असा किस्सा अजित पवारांनी ऐकवल्यावर सभागृहात हशा पिकला.

हेही वाचा - कोरोनाचा धसका कानिफनाथ यात्रेला, यंदा प्रथमच 'या' परंपरेला छेद

जयंत पाटील यांनी यानिमित्ताने झिरवळ यांच्या कार्याचा गौरव केला. विधानसभा उपाध्यक्ष हे विरोधी पक्षनेत्याच्या शेजारी असतात. विरोधी पक्षनेते सुसंस्कृत आहेत, परंतु त्यांच्या मागे बसणारे (दोघेही) आशिष शेलार आणि गिरीश महाजन यांच्यापासून त्यांनी नेहमी दूर राहावे. कारण वार नेहमी मागून होतात असा सल्ला नरहरी झिरवाळ यांना दिला, त्यानंतरही सभागृहात हास्यकल्लोळ उडाला.

अभिनंदन प्रस्तावाच्या चर्चेत देवेंद्र फडणवीस फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेऊन नरहरी यांना दिल्लीला नेलेल्या प्रसंगाची चांगलीच आठवण निघाली. दिल्लीचे अनुभव सांगा अशी सर्वपक्षीय सदस्यांच्या अपेक्षा होती. परंतु, सांगतो सांगतो असे म्हणत नरहरी झिरवाळ यांनी शेवटपर्यंत याच्यावर भाष्य टाळले. सुधीर मुनगंटीवार यांनी झिरवळ आमच्याबरोबर दोन दिवस होते, म्हणून आम्हाला निश्चितपणे मदत करतील, असा टोला लगावला. परंतु, मंत्री छगन भुजबळ यांनी झिरवळ कसे दिल्लीतून गनिमी काव्याने निसटून आले, असे सांगत मुंबईत आल्यावर त्यांच्या अंगावर वेगळेच कपडे होते, असे सांगितले. तुम्ही भाजपने कपडे काढले आम्ही नरहरी झिरवळांना कपडे घातले असाही टोला भुजबळ यांनी लगावला.

हेही वाचा - CORONA VIRUS : शहरांमधील सर्व शाळा, महाविद्यालये, मॉल्स 31 मार्चपर्यंत बंद

विरोधक डाव्या बाजूला बसत असल्याने डाव्या बाजूकडे जरा जास्त लक्ष ठेवा, अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्याचा संदर्भ घेत, सतत मोबाइलवर बोलत असल्याने काही काळापासून मला डाव्या कानाने कमी ऐकू येते, असे झिरवाळ यांनी आभाराच्या भाषणात जाहीर करताच हशा उसळला.

कोण आहेत नरहरी झिरवाळ?

नरहरी झिरवाळ हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे. विधानसभेच्या 2004 च्या निवडणुकीत नरहरी यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजय मिळवला होता. मात्र, 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या धनराज महाले यांनी त्यांचा पराभव केला. हा पराभव त्यांनी 2014 च्या निवडणुकीत भरून काढला.
विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत त्यांनी 12 हजार 633 मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिरवाळ यांनी 60 हजार 813 च्या मताधिक्याने शिवसेनेचे उमेदवार भास्कर गावित यांचा पराभव केला. या विजयासह सलग दोनवेळा निवडून येण्याचा बहुमान त्यांना मिळाला.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर काँग्रेस आमदार नाना पटोले यांच्यावर विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्याचे जागा वाटपात ठरले होते. मात्र, उपाध्यक्षांची नेमणूक अद्याप करण्यात आलेली नव्हती.

Last Updated : Mar 15, 2020, 9:50 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.