ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 1228 नवे रुग्ण, 62 मृत्यू, कोरोनाग्रस्तांचा आकडा 98, 979 वर

मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 228 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आल्याने कोरोनाबाधितांची संख्या 98 हजार 979 वर पोहचली आहे. तर, 62 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 5 हजार 582 वर पोहचला आहे. तर, आज दिवसभरात मुंबईमध्ये 803 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

author img

By

Published : Jul 17, 2020, 10:22 PM IST

मुंबईत कोरोनाचे 1228 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे 1228 नवे रुग्ण

मुंबई : कोरोनाचे मुंबईत 1 हजार 228 नवे रुग्ण आढळून आले असून 62 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 98 हजार 979 वर पोहोचला आहे. तर, मृतांचा आकडा 5 हजार 582 वर पोहोचला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत एकूण 69 हजार 340 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या 24 हजार 57 सक्रिय रुग्ण आहेत. मुंबईमधील रुग्ण बरे होण्याचा दर 70 टक्क्यांवर पोहोचला आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 62 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी 55 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 43 पुरुष तर 19 महिला रुग्णांचा समावेश आहे. मुंबईतून आज दिवसभरात 803 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 69 हजार 340 वर पोहोचला आहे. मुंबईत कोरोनाचे 98 हजार 979 रुग्ण असून 69 हजार 340 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 5 हजार 582 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 24 हजार 57 सक्रिय रुग्ण आहेत.

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70 टक्क्यांवर पोहोचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 52 दिवस तर सरासरी दर 1.34 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 700 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 3 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे निदान करण्यासाठी 4 लाख 21 हजार 345 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.