ETV Bharat / state

नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन मागे - महापालिका आयुक्त मिसाळ

महापालिका आयुक्त मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कामगार एका विशिष्ठ दबावाखाली काम करत असल्याचे नवी मुंबई इंटकचे व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांचे शिष्टमंडळ घेवून जात पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.

नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन मागे...

author img

By

Published : Jan 6, 2020, 2:39 AM IST

नवी मुंबई - महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी काही दिवसांपूर्वी स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांच्यासह अन्य 2 कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. कर्मचाऱ्यांचे झालेले निलंबन अन्यायकारक आहे आणि हे निलंबन मागे घ्यावे, म्हणून महाराष्ट्र कर्मचारी युनियन आणि नवी मुंबई इंटकने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यानंतर महापालिका आयुक्तांनी अखेर स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांचे निलंबन मागे घेतले.

महापालिका आयुक्त मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कामगार एका विशिष्ठ दबावाखाली काम करत असल्याचे नवी मुंबई इंटकचे आणि महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांचे शिष्टमंडळ घेवून जात पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते.

आयुक्तांनी अरूण पाटील यांचे निलंबन मागे घेतल्यानंतर नवी मुंबई इंटकचे आणि महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कार्याध्यक्ष सिद्धार्थ चौरे, सचिव मंगेश गायकवाड, पालिकेतील सर्व स्वछता निरीक्षक यांनी आयुक्त मिसाळ यांची भेट घेतली आणि यापुढे चांगले काम करून दाखवू, असे सांगितले. आयुक्त मिसाळ यांनी चांगल्या कामासाठी मी तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत चांगले काम करा आणि पालिका प्रशासनाचा नावलौकीक वाढवा, असे आवाहन केले. यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी इतर २ अधिकाऱ्यांचेही निलंबन मागे घ्या, अशी आयुक्त मिसाळ यांना विनंती केली.

:.

Intro:
नवी मुंबई महानगरपालिका स्वच्छता निरीक्षकांचे निलंबन मागे...

नवी मुंबई :

नवी मुंबई महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी काही दिवसापूर्वी स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांच्यासह अन्य दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले होते. कर्मचाऱ्यांचे झालेले निलंबन अन्यायकारक असून ते निलंबन मागे घ्यावे म्हणून महाराष्ट्र कर्मचारी युनियन व नवी मुंबई इंटकने पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. महापालिका आयुक्तांनी अखेरिला स्वच्छता निरीक्षक अरूण पाटील यांचे निलंबन मागे
घेतले.

महापालिका आयुक्त मिसाळ यांनी कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कामगार एका विशिष्ठ दबावाखाली काम करत असल्याचे नवी मुंबई इंटकचे व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी कामगारांचे शिष्टमंडळ घेवून जात पालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले होते. आयुक्तांनी अरूण पाटील यांचे निलंबन मागे घेतल्यावर नवी मुंबई इंटकचे व महाराष्ट्र कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र सावंत, कार्याध्यक्ष सिद्धार्थ चौरे, सचिव मंगेश गायकवाड, पालिकेतील सर्व स्वछता निरीक्षक यांनी आयुक्त मिसाळ यांची भेट घेऊन यापुढे चांगले काम करून दाखवू असे सांगितले ,आयुक्त मिसाळ यांनी चांगल्या कामासाठी मी तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत चांगले काम करा व पालिका प्रशासनाचा नावलौकीक वाढवा असे आवाहन केले. यावेळी कामगार नेते रवींद्र सावंत यांनी इतर २ अधिकाऱ्यांचेही निलंबन मागे घ्या अशी आयुक्त मिसाळ यांना विनंती केली.

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.