मुंबई - शहरासह उपनगरात आत्तापर्यंत कोरोणा विषाणूचे ३ रुग्ण आढळले असून त्यांच्यावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर, मुंबई उपनगरातील टिळकनगर येथे कोरोनाचा एक 64 वर्षीय संशयित रुग्ण आढळला आहे. त्यांना उपचारासाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पालिकेकडून ते राहत असलेल्या इमारतीची आज(शुक्रवार) स्वच्छता करण्यात आली. या व्यक्तीच्या संपर्कात इतर कोणी आले का, याचीही पालिका आरोग्य विभाग सध्या तपासणी करत आहे.
जगभरात पसरलेला कोरोना विषाणू मुंबईत येऊन धडकला आहे. चेंबूरच्या टिळकनगर परिसरात दुबईहुन परतलेल्या एक ६४ वर्षीय व्यक्तीस अचानक अस्वस्थ वाटू लागले असता, उपचाराकरिता मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने नातेवाईकांनी त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करा, उच्च न्यायालयात याचिका दाखल
यासोबतच त्यांच्या संपर्कात आलेले इतर ५ नातेवाईक, घरात काम करणारी महिला, अन्य एक व्यक्ती आणि ३ इमारत सुरक्षा रक्षक संशयित वाटत असल्याने त्यांनाही तपासणी करता कस्तुरबा रुग्णालयात पाठविले आहे. त्या सर्वांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. आज दुपारी एम पश्चिम चेंबूर आरोग्य विभागाने खबरदारी घेत स्वच्छता कामगारांच्या मार्फत ती व्यक्ती राहत असलेली संपूर्ण इमारत व इमारतीचा परिसर योग्य सोल्युशन वापरून साफ केला आहे.
हेही वाचा - कोरोना खबरदारी : मध्यरात्रीपासून 'या' शहरातील चित्रपटगृहे, जिम्स, नाट्यगृहे बंद