ETV Bharat / state

मुंबईत कोरोनाचे 998 नव्या रुग्णांची नोंद; 23 जणांचा मृत्यू, रुग्ण दुप्पटीचा कालावधी 241 दिवसांवर

मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 241 दिवस तर सरासरी दर 0.29 टक्के आहे. रविवारी मुंबईत कोरोनाच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच नव्या 576 रुग्णांची नोंद झाली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

new corona patients reported in mumbai
मुंबई
author img

By

Published : Nov 9, 2020, 6:53 AM IST

मुंबई - शहरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. मात्र गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचे दिसून येत आहे. रविवारी मुंबईत कोरोनाच्या सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच नव्या 576 रुग्णांची नोंद झाली असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील सत्तावीस दिवसात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 69 वरून 222 दिवस इतका वाढल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

रुग्ण आणि मृतांचा आकडा कमी झाला -
मुंबईत रविवारी कोरोनाचे 998 नवे रुग्ण आढळून आले असून 23 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 16 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 18 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 64 हजार 543 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 442 वर पोहचला आहे. तर, रविवारी 865 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 36 हजार 552 वर गेला आहे. सध्या मुंबईत 16 हजार 859 सक्रिय रुग्ण आहेत.

रुग्ण दुप्पटीचा कालावधी 241 दिवसांवर -
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 241 दिवस तर सरासरी दर 0.29 टक्के आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण आढळलेल्या 502 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 6 हजार 273 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 16 लाख 17 हजार 439 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.