ETV Bharat / state

Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 35 हजार 756 नवे कोरोनाबाधित; 79 जणांचा मृत्यू

राज्यात आज(26 जानेवारी) 35 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases in Maharashtra) झाली आहे. तर आज 79 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला (Corona Patients Deaths) आहे. दिवसभरात 39 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 2 लाख 98 हजार इतके आहेत.

corona file photo
कोरोना फाईल फोटो
author img

By

Published : Jan 26, 2022, 8:41 PM IST

Updated : Jan 26, 2022, 9:20 PM IST

मुंबई - राज्यात आज(26 जानेवारी) 35 हजार 756 नवीन कोरोना रुग्णांची नोंद (New Corona Cases in Maharashtra) झाली आहे. तर आज 79 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला (Corona Patients Deaths) आहे. तसेच आज राज्यात एकही ओमायक्रॉनचा रुग्ण (No Omicron in State on 26 January) आढळला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दिवसभरात 39 हजार रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोनाचे सक्रिय रुग्ण 2 लाख 98 हजार इतके आहेत.

हेही वाचा - Mumbai Corona Update : मुंबईत बुधवारी १८५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, १३ जणांचा मृत्यू

  • 26 जानेवारीची आकडेवारी -

राज्यात मंगळवारी 33 हजार 914 रुग्णांची नोंद झाली होती. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 33 हजार 756 रुग्ण आढळून आले आहेत. पैकी 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मृत्यूदर 1.87 टक्के इतका आहे. दिवसभरात 39 हजार 857 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बरे होणाऱ्या बाधितांचे प्रमाण 94.15 टक्के इतके आहे. तसेच 71 लाख 60 हजार 293 कोरोनाबाधित बरे झाले आहेत.

  • सक्रीय रुग्णांची संख्या 3 लाखांच्या जवळ -

7 कोटी 38 लाख 68 हजार 385 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 76 लाख 5 हजार 181 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 15 लाख 46 हजार 643 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3298 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 2 लाख 98 हजार 733 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  • ओमायक्रॉनचा दिलासा-

राज्यात आज ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आला नाही. मंगळवारी 13 नव्या बाधितांची नोंद झाली होती. राज्यात आतापर्यंत 2 हजार 858 एवढे ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत. आज रुग्ण आढळून आले नसले तरी 1534 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली आहे. या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 6328 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6236 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 92 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

  • विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

मुंबई महापालिका - 1858

ठाणे - 172

ठाणे मनपा - 340

नवी मुंबई पालिका - 716

कल्याण डोबिवली पालिका - 260

मीरा भाईंदर - 100

वसई विरार पालिका - 210

नाशिक - 757

नाशिक पालिका - 1439

अहमदनगर - 807

अहमदनगर पालिका - 269

पुणे - 2216

पुणे पालिका - 5538

पिंपरी चिंचवड पालिका - 3236

सातारा - 1271

नागपूर मनपा - 3011

Last Updated : Jan 26, 2022, 9:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.