मुंबई - राज्यात कोरोनाची रुग्ण संख्या (Corona Cases Hike) घटत असताना आज किंचितशी वाढ झाली. सोमवारी 28 हजार रुग्ण सापडले होते. आज दिवसभरात 33 हजार 914 रुग्ण आढळून आले (Today New Corona Cases) असून, 86 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत रुग्णसंख्या स्थिरस्थावर असून आज अठराशे रुग्णांची नोंद झाली आहे. तर सक्रिय रुग्ण तीन लाख असल्याने राज्याच्या आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. ओमायक्रोनचे देखील आज 13 रुग्ण सापडले असून सर्व पुणे आणि पिंपरी चिंचवड भागातील आहेत, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
- आजची कोरोना आकडेवारी -
कोरोनाचा रुग्ण संख्येत दिवसेंदिवस चढ उतार दिसून येत आहेत. सोमवारी 28 हजार 286 रुग्ण आढळून आले होते. आज 2 हजार रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आजपर्यंतची रुग्णसंख्या 75 लाख 69 हजार 425 इतकी झाली आहे. आजच्या 33 हजार 914 रुग्णांचा यात समावेश आहे. आज 86 बधितांचा मृत झाला असून राज्यातील मृत्यूदर 1.87 टक्के इतका खाली आला आहे. तर 30 हजार 500 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ठणठणीत बरे होणाऱ्या बधितांचे 94.7 टक्के इतके आहे. आजपर्यंत 71 लाख 20 हजार 436 करोना बाधित बरे झाले आहेत. आजपर्यंत 7 कोटी 36 लाख 84 हजार 359 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 75 लाख 69 हजार 425 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 16 लाख 20 हजार 371 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3358 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 3 लाख 2 हजार 923 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- ओमायक्रॉनचे 13 रुग्ण
राज्यात आज ओमायक्रोनचे 13 नव्या बाधितांची नोंद झाली. जे. बी. वैद्यकीय महाविद्यालयने सर्व अहवाल तपासले आहेत. त्यात सर्वाधिक पुणे मनपा 12 आणि पिंपरी चिंचवड 1 रुग्ण सापडला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत 2 हजार 858 एवढे रुग्ण आहेत. तर 1534 जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने सर्वांना घरी सोडण्यात आले. आज पर्यंत 6328 नमुने जनुकीय चाचणीसाठी पाठवले. त्यापैकी 6236 चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 92 नमुन्यांचे अहवाल प्रलंबित असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
- विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -
मुंबई महापालिका - 1815
ठाणे - 187
ठाणे मनपा - 401
नवी मुंबई पालिका - 745
कल्याण डोबिवली पालिका - 221
मीरा भाईंदर - 118
वसई विरार पालिका - 133
नाशिक - 845
नाशिक पालिका - 1922
अहमदनगर - 1097
अहमदनगर पालिका - 858
पुणे - 2047
पुणे पालिका - 5323
पिंपरी चिंचवड पालिका - 3299
सातारा - 881
नागपूर मनपा - 3023
हेही वाचा - सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक सायरस पूनावाला यांना पद्मभूषण जाहीर, नोबेलसाठीही झाले होते नामांकन