मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिका मुख्यालय परिसरात अनेक पर्यटक या ठिकाणी असलेल्या सेल्फी पॉईंटवर येत असतात. मात्र, याठिकाणी पर्यटकांसाठी बसण्यासाठी आणि चालण्यासाठी रस्ता नव्हता. आता यावर पर्याय काढत पालिकेतर्फे काही रस्ता राखीव करण्यात आला आहे. तसेच डांबरी रस्त्यांना पिवळ्या रंगाने रंगविण्यात आले आहे. त्यामुळे डांबरी काळ्या रस्त्यांना सोन्याची झळाळी मिळाल्याचा भास होतो. याशिवाय लोकांना चालण्यासाठी हक्काची जागाही मिळाली आहे.
एका बाजूला बृह्न्मुंबई महापालिका तर दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मध्यभागी सेल्फी पॉइंट सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तीनही ठिकाणच्या कडेला पिवळ्या रंगाच्या पट्ट्या मारून पिवळा रस्ता तयार करण्यात आला आहे. या पिवळ्या रंगाला पुरातन वस्तू समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.
हेही वाचा - 'लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, तर पुढं संसार नीट कसा होणार?'
या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी अथवा पर्यटक असतील या दृश्याचा आनंद लुटत आहेत. महानगरपालिका आणि इतर खासगी कंपनीच्या वतीने हा पिवळा रंग देऊन रस्ता बनवण्यात आलेला आहे. शिवाजी महाराज टर्मिनस व महानगरपालिका या दोघांमध्ये सेल्फी स्टॅन्ड आहे. राज्यात देशातील देशाबाहेरील पर्यटक या ठिकाणी येऊन याचा आनंद घेत आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेले काम आता पूर्ण झालेले आहे. या रस्त्याच्या कडेला संपूर्ण पिवळा रंग देण्यात आलेला आहे. तसेच लोकांना बसण्यासाठी मुंबई महानगरपालिकाच्या वतीने आसनव्यवस्था देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा - राज्यपालांची सदिच्छा भेट... मात्र ज्या गोष्टी बोलायच्या आहेत, त्या बोलणारच - संजय राऊत