मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवार, 1 ऑक्टोबरला 3 हजार 105 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 50 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 3 हजार 164 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के, तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.
- 36,371 सक्रिय रुग्ण -
शुक्रवारी राज्यात 3105 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 53 हजार 961 वर पोहचला आहे. तर शुक्रवारी 50 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 117 वर पोहचला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 63 लाख 74 हजार 892 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.27 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 89 लाख 10 हजार 564 नमुन्यांपैकी 65 लाख 53 हजार 961 नमुने म्हणजेच 11.13 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 42 हजार 110 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 36 हजार 371 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
- रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2 हजार 583, 21 सप्टेंबरला 3 हजार 131, 22 सप्टेंबरला 3 हजार 608, 23 सप्टेंबरला 3 हजार 286, 24 सप्टेंबरला 3 हजार 276, 26 सप्टेंबरला 3 हजार 292, 27 सप्टेंबरला 2 हजार 432, 28 सप्टेंबरला 2 हजार 844, 29 सप्टेंबरला 3 हजार 187, 30 सप्टेंबरला 3 हजार 63, 1 ऑक्टोबरला 3105 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 22 सप्टेंबरला 48, 23 सप्टेंबरला 51, 24 सप्टेंबरला 58, 26 सप्टेंबरला 36, 27 सप्टेंबरला 32, 28 सप्टेंबरला 60, 29 सप्टेंबरला 49, 30 सप्टेंबरला 56, 1 ऑक्टोबरला 50 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.
- या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 425
अहमदनगर - 586
पुणे - 456
पुणे पालिका - 161
पिंपरी चिंचवड पालिका - 131
सोलापूर- 170
सातारा - 178
हेही वाचा - पुणे जिल्ह्यातील दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक!