मुंबई - आज राज्यात ३,०१५ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,९७,९९२ वर पोहचला आहे. राज्यात आज ५९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५०,५८२ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ४६,७६९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के -
राज्यात आज ४,५८९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण १८,९९,४२८ कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०७ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३९,५७,४६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,९७,९९२ नमुने म्हणजेच १४.३१ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २,१८,३२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ४६,७६९ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
या दिवशी कमी रुग्णांची नोंद -
राज्यात १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, १८ जानेवारीला १,९२४ सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे.
हेही वाचा - तांडव : दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा अटकपूर्व जामीन मंजूर
हेही वाचा - सरकारने मराठा आरक्षणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे - विनोद पाटील