मुंबई Bombay High Court : रवींद्र म्हात्रे आणि त्यांची पत्नी दीपा म्हात्रे यांनी आरोपी वसंत पाटील आणि कल्पेश पाटील यांना विचारणा केली. (Mumbai High Court) त्यावेळेला पती-पत्नी आणि कल्पेश पाटील, वसंत पाटील यांच्यामध्ये प्रचंड बाचाबाची होऊन भांडण देखील झाले. (Mumbai Police Commissioner) त्यामध्ये कल्पेश पाटील आणि वसंत पाटील यांनी रविंद्र म्हात्रे यांना जबर मारहाण केल्यामुळे 25 ऑक्टोबर 2022 रोजी कोपर खैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला.
म्हात्रे कुटुंबावर पुन्हा हल्ला: 12 डिसेंबर 2022 रोजी पुन्हा पती-पत्नी दुचाकीवरून जात असताना आरोपी कल्पेश पाटील आणि वसंत पाटील यांनी दुचाकीवर लाथ मारून त्यांना खाली पाडले. परिणामी म्हात्रे यांचा पाय फॅक्चर झाला; मात्र या संपूर्ण घटनेची पोलीस व्यवस्थित चौकशी करत नव्हती किंवा सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत नव्हती. म्हणूनच आरोपींना शिक्षा होऊ शकत नव्हती. त्यामुळे वाशी न्यायालयानेच यामध्ये खटला दाखल करत हस्तक्षेप करण्याची विनंती पीडित कुटुंबाकडून केली गेली.
म्हणून आरोपींना मिळाला जामीन: खटला वाशी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात उभा राहिला. परंतु, आरोपी वसंत पाटील आणि कल्पेश पाटील यांना अटी आणि शर्तीवर जामीन दिला गेला. यावेळी न्यायालयाने अट घातली की, ते तपासामध्ये कोणताही छेडछाड करणार नाही किंवा प्रभाव टाकणार नाही; मात्र कुटुंबाचं म्हणणं होतं की, पोलीस तपास करत नाही. सीसीटीव्ही फुटेज स्वतः आम्ही दिलेले आहे. तरी देखील पोलीस तपास करत नाही त्यामुळेच आरोपी तपासावर प्रभाव टाकतात.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे: पीडित रवींद्र म्हात्रे यांच्या वतीने वकील सुजय गावडे यांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या समोर संपूर्ण घटनाक्रम आणि तपासामध्ये अडथळा पोलिसांकडून येत असल्याचा दावा केला. तर आरोपींच्या वतीने वकिलांनी तसा प्रभाव आरोपींकडून टाकला जात नसल्याची बाजू मांडली. दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती अजय गडकरी यांनी आदेश दिले. "जे पीडित व्यक्ती आहेत तेच स्वतः सीसीटीव्ही फुटेज देत आहेत. तेसुद्धा पोलीस तपासत नाही किंवा पडताळणीही करत नाही. पोलिसांचा असला कारभार खपवून घेणार नाही. नवी मुंबई पोलीस आयुक्तांनीच आता स्वतः चौकशी करावी आणि पुढील 3 आठवड्यात त्याबाबत अहवाल सादर करावा असे आदेश दिले.
हेही वाचा:
- Rohit Pawar In Pune University : विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा, नाहीतर पुणे विद्यापीठ बंद पाडू: रोहित पवार
- Thane Crime : दांडिया खेळताना बहिणीला धक्का देणाऱ्या तरुणाला भावाने जाब विचारातच भावावर हत्याराने वार, भाऊ गंभीर
- Man Beaten Woman Teacher : अश्लील मेसेज पाठवल्यानं महिला शिक्षिकेची पोलिसात तक्रार; राग आल्यानं आरोपीकडून पीडितेला मारहाण