ETV Bharat / state

महायुती एकजुटीने प्रचार करणार; मुंबईच्या बैठकीत निर्णय

या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे नेते उपस्थित होते.

author img

By

Published : Mar 26, 2019, 8:43 PM IST

महायुती एकत्रित प्रचार करणार

मुंबई - भाजप- शिवसेना पक्षातील अंतर्गत कुरबुरी संपुष्टात आणण्यासाठी आणि पुढील प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी आज (मंगळवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानी २ बैठका झाल्या. या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे नेते उपस्थित होते.

महायुती एकत्रित प्रचार करणार

या बैठकीत मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, जगन्नाथ पाटील, माधव भंडारी, विनोद तावडे, चंद्रकांत पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांसोबत उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांची चर्चा झाली. बैठकीनंतर विनोद तावडे म्हणाले, प्रचाराची दिशा कशी असावी, यावर बैठकीत चर्चा झाली. २ विभागीय मेळावे मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे होवू शकल्या नाहीत, त्यावर चर्चा झाली. बैठकीत एकजुटीने कामाला लागण्यावर चर्चा झाली.

किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबईच्या उमेदवारीवर अजिबात चर्चा झाली नाही. प्रचार यंत्रणा कशी राबवावी, यावर चर्चा झाली, असे तावडेंनी सांगितले. बैठकीत उपस्थित नेत्यांना अनुभव असल्याने पक्षातील कुरबुरी संपुष्टात आणण्यासाठी आणि पुढील प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन पार पडल्याचे समजते.

Intro:Body:MH_Varsha_Meeting_Tawadebyte_News26.3.19

महायुती एकत्रित प्रचार करणार

वर्षावरील बैठक संपली

मुंबई : भाजप- सेना पक्षातील अंतर्गत कुरबुरी संपुष्टात आणण्यासाठी आणि पुढील प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानी दोन बैठका सेना भाजपच्या अनुभवी नेत्यांसह पार पडल्या.

आजच्या बैठकीत मनोहर जोशी, लीलाधर डाके, सुभाष देसाई, जगन्नाथ पाटील,माधव भंडारी,विनोद तावडे,चंद्रकांत पाटील अशा ज्येष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली.
बैठकीनंतर विनोद तावडे म्हणाले, प्रचाराची दिशा कशी असावी यावर आज बैठकीत चर्चा झाली.दोन विभागीय मेळावे मनोहर पर्रीकर यांच्या निधनामुळे होवू शकल्या नाहीत त्यावर चर्चा झाली. बैठकीत एकजुटीने कामाला लागण्यावर चर्चा झाली.

किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबई च्या उमेदवारी वर अजिबात चर्चा झाली नाही.
प्रचार यंत्रणा कशी राबवावी यावर चर्चा झाली, असे तावडेंनी सांगितले.

बैठकीत उपस्थित या नेत्यांना अनुभव असल्याने पक्षातील कुरबुरी संपुष्टात आणण्यासाठी आणि पुढील प्रचाराची रणनीती ठरवण्यासाठी त्यांचं मार्गदर्शन पार पडल्याचे समजते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.