ETV Bharat / state

बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण - पाटील

आघाडीमध्ये राष्ट्रवादीला किती जागा मिळाव्यात याबाबत कसलीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
author img

By

Published : Jun 13, 2019, 7:33 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढावा घेतला जात आहे. उमेदवार कसे ठरवायचे कोणत्या जागांवर लढवणे आवश्यक आहे, यावर चर्चा सुरू आहेत. मात्र, आघाडीमध्ये राष्ट्रवादीला किती जागा मिळाव्यात याबाबत कसलीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.

बैठकीत जागा वाटपाबाबत चर्चा नाही; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

मुंबईतील बॅलार्ड पियर येथे असलेल्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात आज सकाळपासून कोकणातील सिंधुदुर्गपासून ते पालघर आणि मुंबईपर्यंतच्या विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीची बैठक पार पडली. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे हे उपस्थित होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, विधानसभेची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विभागनिहाय कार्यकर्ते बोलवले होते. यासाठी 5 दिवसात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते बोलवण्याचे ठरलेले आहे. त्याप्रमाणे आज सिंधुदुर्गपासून पालघर, मुंबईपर्यंतच्या विभागांचा आढावा घेण्यात आला. आज पहिला दिवस झाला. तर उद्या (गुरुवारी) उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. तर पुढच्या आठवड्यात 21 आणि 23 जूनला इतर जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे, त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याच्या समावेश असेल.

बारामतीच्या पाण्यासंदर्भात सरकार अन्यायाची भूमिका घेत आहे-

यापूर्वी बारामतीच्या पाण्यासंदर्भात आमच्या सरकारने जे निर्णय घेतले होते ते योग्य होते, सर्वांना न्याय देणारे होते. कोणत्याही भागावर अन्याय करण्याची त्या निर्णयात भूमिका नव्हती. मात्र, आताचे सरकार अन्यायाची भूमिका घेत आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला काही ठिकाणी मताधिक्य मिळाले आहे. तर काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाला मिळाले आहे. त्याबद्दल कार्यकर्त्यांनी आज चिंता व्यक्त केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी परिस्थिती चांगली असतानाही मते आपल्याला कमी का मिळाली? याविषयी अनेक प्रकारच्या शंका आजच्या बैठकीत उपस्थित केल्या. मात्र, विधानसभा निवडणुकीत पुन्हा नव्या जोमाने लढण्यासाठीची तयारी करण्यासाठी सर्वांचे एकमत झाले आहे. तरीही एवढा मोठा पक्ष असल्याने काही ठिकाणी कार्यकर्त्यांची तुरळक नाराजी असेल. परंतु, तो विषय आजच्या बैठकीत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.

शिवसेना आणि भाजपमध्ये उपमुख्यमंत्री कोण व्हावा, यावरून रस्सीखेच सुरू आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये आघाडीचाच मुख्यमंत्री होईल, यासाठी काम करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Intro:आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळाव्यात यावर कसलीही चर्चा नाही, जयंत पाटील यांचे स्पष्टीकरणBody:आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळाव्यात यावर कसलीही चर्चा नाही, जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण

(जयंत पाटील यांचा बाईट मोजोवर पाठवला आहे)

मुंबई, ता. 13 :

विधानसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यासाठीच्या तयारीसाठी आढावा घेतला जात आहे. उमेदवार कसे ठरवायचे कोणत्या जागांवर लढवणे आवश्यक आहे. यावर चर्चा सूर्य आहेत. मात् र आघाडीमध्ये राष्ट्रवादीला किती जागा मिळाव्यात याबाबत कसलीही चर्चा आजच्या बैठकीत झालेली नसल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज केले

मुंबईतील बॅलार्ड पियर येथे असलेल्या राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात आज सकाळपासून कोकणातील सिंधुदुर्ग पासून ते पालघर आणि मुंबईपर्यंतच्या विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या बैठक पार पडली पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीचे नेते अजित पवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत होते
प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,
विधानसभेची तयारी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विभाग निहाय कार्यकर्ते बोलवले होते. यासाठी पाच दिवसात राज्यातील वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते बोलवण्याचे ठरलेले आहे. त्याप्रमाणे आज सिंधुदुर्गपासून पालघर, मुंबईपर्यंतच्या विभागांचा आढावा घेण्यात आला. आज पहिला दिवस झाला उद्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यातील विभागनिहाय आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र मधील जिल्ह्यांचा आढावा घेतला जाईल. तर पुढच्या आठवड्यात 21 आणि 23 जूनला इतर जिल्ह्यांचा आढावा घेतला जाणार आहे त्यात विदर्भ आणि मराठवाड्याच्या समावेश असेल.
बारामतीच्या पाण्यासंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांवर पाटील म्हणाले की,
यापूर्वी बारामतीच्या पाण्यासंदर्भात आमच्या सरकारने जे निर्णय घेतले होते ते योग्य होते सर्वांना न्याय देणारे होते. कोणत्याही भागावर अन्याय करण्याची त्या निर्णयात भूमिका नव्हती. आणि त्यासाठीची कधी भूमिका अजितदादांनी घेतली नाही. आता हे सरकार अन्यायाची भूमिका घेत आहे.

शहरी भागावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या फोकसवर विचारले असता पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीच्यानंतर आम्हाला काही ठिकाणी मताधिक्य मिळाले. काही ठिकाणी सत्ताधारी पक्षाला. त्याबद्दल आज कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी परिस्थिती चांगली असताना ही मते आपल्याला का कमी मिळालीे याविषयी अनेक प्रकारच्या शंका आजच्या बैठकीत उपस्थित केल्या. पण पुन्हा नव्या जोमाने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठीची तयारी करण्यासाठी सर्वांचं जवळजवळ एकमत झालेले असून आता सर्व कामाला लागणार आहेत. त्यातही एवढा मोठा पक्ष असल्याने काही ठिकाणी कार्यकर्त्यांची तुरळक नाराजी असेलही, परंतु तो काही विषय आजच्या बैठकीत झालेला नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
शिवसेना आणि भाजपा मध्ये उपमुख्यमंत्री कोण व्हावा यावरून एकमेकांमध्ये रस्सीखेच सुरू असला तरी विधानसभा निवडणूकिस नंतर मात्र आघाडीचाच मुख्यमंत्री होईल यासाठी आम्ही काम करणार असल्याचे पाटील म्हणाले.Conclusion:आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळाव्यात यावर कसलीही चर्चा नाही, जयंत पाटील यांचे स्पष्टीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.