ETV Bharat / state

22व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी राबवणार 'अभिप्राय अभियान'; उद्यापासून सुरुवात - feedback campaign of ncp news

राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास 5 लाख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

२२ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी राबवणार राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियान

author img

By

Published : May 21, 2020, 1:45 PM IST

मुंबई - येत्या 20 जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 22व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास 5 लाख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी आज (गुरुवार) पत्रकार परिषदेत दिली.

'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' अभियानांतर्गत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी 'महासंवाद' करणार आहेत. यावेळी जयंत पाटील हे जवळपास 5 लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधतील. राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन जवळपास 6 महिने पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे काम करत आहे. काही दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल तसेच राज्य पूर्वपदावर येईल. त्यानंतर उद्भवणाऱ्या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे 'राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय' या अभियानांतर्गत लोकांपर्यंत मदत पोहोचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत जाणून घेणार आहेत. या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. येत्या 22 मे 2020 रोजी दुपारी 4 वाजल्यापासून हे अभियान सुरू केले जाणार आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षासाठी झटला आहे. पक्षाचे जे काही वैभव आहे ते कार्यकर्त्यांमुळेच आहे, म्हणून त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. कार्यकर्ते आहेत म्हणून पक्ष आहे, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी मांडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.