ETV Bharat / state

संविधानातील घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी - राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेश

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेशच्या वतीने नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे आदी नेत्यांना संविधानातील घटकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले.. शाळेत आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील भाग दोन, तीन आणि चार मधील 'अनुच्छेद 5 ते अनुच्छेद 51अ' हे अभ्याक्रमात कसे राबवले जावेत, याचा अहवाल दिला आहे.

संविधानातील घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

author img

By

Published : Feb 14, 2020, 11:22 PM IST

मुंबई - भारतीय संविधानाची शालेय जीवनातच ओळख व्हावी तसेच विद्यार्थी दशेपासूनच प्रत्येकाला संविधानाचे महत्त्व कळावे, यासाठी महाराष्ट्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये संविधानातील काही महत्त्वाचे लेख संक्षिप्त स्वरुपात पाठ्यक्रमात समाविष्ट करावेत, तसेच संविधान हा एक स्वतंत्र विषय म्हणून शिकवला जावा, या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मुंबई प्रदेशच्या वतीने नुकतेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, खासदार सुप्रिया सुळे आदी नेत्यांना सादर करण्यात आले.

संविधानातील घटकांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी

या निवेदनाची सरकारने सकारात्मक दखल घेऊन लवकरात लवकर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावले असून चर्चेत काही संबंधित अधिकारीही सहभागी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मुंबई सचिव स्नेहल कांबळे यांनी दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांवर संवैधानिक संस्कार होण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये संविधान प्रास्ताविक वाचण्याच्या शासनाच्या निर्णयाचे स्वागत होत आहे.

हेही वाचा - 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'ची मध्य रेल्वेलाईनवर नजर; 'या' स्थानकावर होणार चाचणी

शालेय पाठ्यक्रमात संविधानाचा अभ्यास शिकवावा, यासाठी केलेल्या निवेदनासोबत शाळेत 'आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांना' भारतीय संविधानातील भाग दोन, तीन आणि चार मधील 'अनुच्छेद 5 ते अनिच्छेद 51अ' हे अभ्याक्रमात कसे राबवले जावेत, याचा अहवाल दिला आहे. तसेच अहवालामध्ये अभ्यासक्रम, कोणत्या इयत्तेला शिकवावे, शिक्षकांना कसे प्रशिक्षण द्यावे ह्याचा संपूर्ण अहवाल लिहिला आहे.

हेही वाचा - अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण खटला दुसऱ्या न्यायाधीशांकडे वर्ग

येणाऱ्या काळात संविधान हे शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमात नक्कीच अंतर्भूत केले जाईल ह्याची खात्री स्नेहल कांबळे ह्यांनी व्यक्त केली असून राज्यातील इतर संस्थांनी सुद्धा ह्या विषयात एकत्र यावे, अशी साद कांबळे यांनी घातली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.