मुंबई : राष्ट्रवादीमध्ये फुट पडली असुन अजित पवार यांच्यासह 40 आमदार भाजपच्या गळाला लागले आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून गेलेल्या काही आमदारांनी आज शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रावादी पक्ष आमच्या सोबत असल्याचे सांगितले. मात्र, शरद पवारांनी याचा इन्कार केला आहे. "ज्यांच्यावर आरोप झाला तेवढेच त्यांच्यासोबत गेले. जे गेले नाहीत ते आमच्या सोबत आहेत' असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
-
मी साहेबांबरोबर... pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मी साहेबांबरोबर... pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023मी साहेबांबरोबर... pic.twitter.com/npZZVEvKk2
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) July 2, 2023
या सर्व घडामोडीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. रविवारी (दि. 2) दुपारी सुरू झालेल्या या राजकीय भूकंपात जयंत पाटील यांनी कोणतीही भूमिका बजावली नाही. ते शरद पवार यांच्यासोबत आहेत की, अजित पवार यांच्यासोबत आहेत हे स्पष्ट झाले नाही. मात्र खुद्द शरद पवार यांनी याबाबत माहिती दिली. दुपारी शपथविधी सोहळ्यानंतर शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी जयंत पाटील यांची माहिती दिली.
"जयंत पाटील सकाळी 10 वाजल्यापासून मुंबईतील कार्यालयात बसले आहेत. पक्ष सोडलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल. याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली जाईल." - शरद पवार
‘मी विथ साहेब : जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये केवळ दोन शब्द लिहून आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मी विथ साहेब...’ असे ट्विट करत त्यांनी शरद पवारांसोबतचा फोटोही पोस्ट केला आहे. यानंतर जयंत पाटील लवकरच पवारांची भेट घेणार आहेत. यामुळे सकाळपासून जयंत पाटील यांच्याबाबत सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
गेलेल्यावर कारवाई : "पक्षाचे धोरण आणि नीती याच्याशी आज ज्यांनी शपथ घेतली, जे सत्तेत गेले त्यांची भूमिका सुसंगत नाही. त्याच्यामुळे याच्याशी सहमत नाही." तसेच तटकरे, प्रफुल पटेल, भुजबळ यांच्यावर मी विश्वास टाकला होता. पण त्यांनी पक्षाच्या धोरणाशी विसंगत भूमिका घेतलेली आहे. त्यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समती दर्शवत नाही. वरिष्ठांशी चर्चा करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे पवार म्हणाले.