ETV Bharat / state

132 जणांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान; शरद पवार यांनी दिला आठवणींना उजाळा - Agriculture Minister Time Memories

Sharad Pawar : कृषी, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रांत काम करणाऱ्या राज्यातील 132 जणांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान (Sharad Pawar Inspire Fellowship) करण्यात आली. यावेळी कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय आठवणींना उजाळा दिला.

Sharad Pawar News
शरद पवार यांनी दिला आठवणीनीना उजाळा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2023, 10:27 PM IST

कार्यक्रमात बोलताना शरद पवार

मुंबई Sharad Pawar : राज्यातील राजकारणामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अपात्रतेवरून एका बाजूला राजकारण तापलं असताना, दुसऱ्या बाजूला दोन्ही पक्षातील नेते सामाजिक कार्यात व्यग्र असल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रदान (Sharad Pawar Inspire Fellowship) करण्यात आली.

अस्वस्थ झालो होतो : कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राजकीय आठवणींना उजाळा देत, ब्राझीलमधून अन्नधान्य आयात करण्याबाबत आठवण सांगितली. आपला देश स्वयंभू बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आपल्या देशातील कृषी क्षेत्रात अनेक बदल घडतं आहेत. आजच्या घडीला आपण आपली भूक भागवत इतर देशांना अन्नधान्याचा पुरवठा करतोय. जेंव्हा देशाचा कृषिमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली तेंव्हा माझ्याकडे पहिली फाइल आली ती ब्राझील देशामधून अन्नधान्य आयात करण्याबाबत. आपण ती फाईल पाहून अस्वस्थ झाल्याची आठवण शरद पवार यांनी यावेळी सांगितली. तेव्हा ठरलं की, ही परिस्थिती बदलायला हवी. हे चित्र बदलण्यासाठी मी प्रयत्न सुरू केले. त्यानंतरच्या पुढच्या पाच ते सहा वर्षात सगळं चित्र बदलून गेल्याचं त्यांनी सांगितलं. आज अन्नधान्याच्या क्षेत्रात आपला देश स्वयंपूर्ण झाल्याचंही शरद पवार यावेळी म्हणाले.

132 जणांना फेलोशिप प्रदान : राज्यातील 132 जणांना कृषी, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासाठी शरद पवार यांच्या उपस्थितीत फेलोशिप प्रदान करण्यात आली. यावेळी शरद पवार यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यशवंतराव चव्हाण सेंटरमधून अनेक उपक्रम केले जातात. शिक्षण, साहित्य आणि कृषी या बद्दलची आस्था वेगळी सांगायची गरज नाही.अनेक लोक महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यातून येतात. भावनगड ह्या इथून निवड झाली हे खूप महत्वाचे आहे. हा प्रदेश नक्षलीने वेढलेला प्रदेश आहे. तिथे क्वचित लोकांनी भावनगड लोकांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न केला असेल, तिथे गेल्यावर अत्यंत वेगळी परिस्थिती आहे. तिथे उपक्रम राबविले जातात.

हेही वाचा -

  1. शरद पवारांचे खरे राजकीय वारसदार अजित पवारचं - उदयकुमार आहेर
  2. “जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, अजित पवार गटाची आव्हाडांवर जहरी टीका
  3. संसदेच्या हिवाळी अधिवेशनासाठी शरद पवार दिल्लीत दाखल, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.