ETV Bharat / state

​​NCP Political Crisis: अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांचे एक पाऊल पुढे, निवडणूक आयोगात 'ही' याचिका दाखल - अजित पवार

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पाहणे देखील महत्त्वाचे आहे.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Jul 5, 2023, 12:08 PM IST

Updated : Jul 5, 2023, 1:01 PM IST

मुंबई : शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता. निवडणूक आयोगाने त्यानंतर पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले. याच पद्धतीने अजित पवार यांनी पक्षात बंड केल्यानंतर थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक आयोगात याला आव्हान देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाने निर्णय देण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी करणारे कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. पक्षात राष्ट्रीय अध्यक्षांकडे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे अधिकार नियुक्तीचे आदेश अध्यक्ष देऊ शकतात. कार्याध्यक्ष हे नामधारी पद असल्याने त्यांच्या सांगण्यावरून निवडणूक आयोगाने कोणत्याही निर्णय घेऊ नये, असे कॅव्हेटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

शिंदे गटाने बंड केल्यानंतर थेट शिवसेना पक्ष आणि नावावर दावा केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे चांगलेच अडचणीत आले होते. सध्याची घडामोडी पाहता अजित पवारदेखील राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा करण्याची शक्यता आहे. तसेच आपलाच पक्ष हा राष्ट्रवादी आहे, असा दावा केला जाऊ शकतो. ही शक्यता लक्षात घेऊन शरद पवार यांनी निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केली आहे.

शरद पवार यांची बाजू आयोगाला ऐकावी लागणार- अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षावर दावा केला तर सुरुवातीला शरद पवार गटाची बाजू निवडणूक आयोगाला ऐकावी लागणार आहे. निवडणूक आयोगाला एकतर्फी निकाल देता येणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बंडानंतर कायदेशीर मार्ग पत्करणार नाही, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र, अजित पवार यांचा आक्रमक पवित्रा, त्यांच्याकडून ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा, यामुळे पवार यांनी सावधगिरीचा पवित्रा उचलल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

  1. NCP Political Crisis: राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण; अजित पवारांनी बोलावली बैठक, 90 टक्के आमदारांचा आहे पाठिंबा
  2. ​​NCP Political Crisis: शरद पवारांकडे केवळ 9 आमदार? ​​​44 आमदारांचे पाठिंब्याचे प्रतिज्ञापत्र असल्याचा आमदार अनिल पाटील यांचा दावा
  3. Maharashtra Political Crisis: अजित पवारांच्या गटाला मंत्री पदे, किती दिवस वाट पहायची? शिंदे गटाच्या कोअर कमिटीत खडाजंगी

Last Updated : Jul 5, 2023, 1:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.